सलमान खान आणि शाहरूख खान यांच्‍यावर श्री गणेशमूर्तीची स्‍थापना अन् आरती केल्‍यावरून टीका

धर्मनिरपेक्ष भारतातील धर्मांध मुसलमानांचा थयथयाट !

सलमान खान

मुंबई – अभिनेते सलमान खान यांची बहीण अर्पिता हिच्‍या घरी श्री गणेशाचे आगमन झाल्‍यावर तेे सहकुटुंब आरती करतांनाचा व्‍हिडिओ प्रसारित झाला होता. त्‍यानंतर त्‍यांच्‍या धर्मबांधवांनी त्‍यांच्‍यावर सामाजिक माध्‍यमांतून ‘इस्‍लामला लागलेला कलंक’ अशा शब्‍दांत टीका केली.

अर्पिता ही सलमान खान यांची दत्तक बहीण असून तिला खान कुटुंबाकडून हिंदु म्‍हणूनच वाढवण्‍यात आले. यासह सलमान खान यांची आई हिंदु (सारस्‍वत ब्राह्मण) आहे, असेही सलमान खान यांच्‍या समर्थकांनी या टीकेला उत्तर देतांना म्‍हटले आहे.


मुंबई – अभिनेते शाहरूख खान यांनीही श्री गणेशमूर्तीची स्‍थापना केल्‍याने त्‍यांच्‍यावरही त्‍याच्‍या धर्मबांधवांनी आगपाखड केली आहे. शाहरूख खान यांनी ‘एक्‍स’ (पूर्वीचे ट्‍विटर) वर श्री गणेशचतुर्थीच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या आहेत. त्‍यानंतर पाकिस्‍तानी ‘यूट्यूबर’ (यूट्यूब चॅनल चालवणारा) किंजा जीशान याने शाहरूख खान याने मूर्तीपूजा केल्‍यावरून प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित केले आहे. ‘मुसलमान असूनही हा हे कसे करत आहे ? अल्ला एकच असूनही ही नाटके कशाला ? हे लोक देशभक्‍त असल्‍याचा दिखावा करतात. मुसलमान असून ही स्‍थिती आहे. तू चांगला मुसलमान नाहीस. मुसलमान आहेस कि हिंदु ? हे आधी ठरव’, असे त्‍याने म्‍हटले आहे.

यापूर्वीही अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्‍या आमदार नुसरत जहाँ यांना बंगालमधील दुर्गापूजेत सहभागी झाल्‍याविषयी धमक्‍या आल्‍या होत्‍या. अभिनेत्री सारा अली खान यांनाही मंदिरात जाण्‍यावरून मुसलमानांनी दुषणे दिले होते.

संपादकीय भूमिका

सहस्रो हिंदु मुसलमानांच्‍या कबरीवर चादर चढवायला जातात. त्‍यांच्‍यावर कुणीही टीका करत नाही, हे लक्षात घ्‍या !