राष्ट्रपती विधवा आणि आदिवासी असल्याने त्यांना संसदेच्या उद्घाटनाला न बोलावणे, हा सनातन धर्म आहे का ? – उदयनिधी स्टॅलिन

उदयनिधी स्टॅलिन यांचा भाजपाला प्रश्‍न !

मदुराई (तमिळनाडू) – संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन झाले. भाजपने तमिळनाडूतून पुरोहित बोलावले होते. त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला; मात्र भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आले नाही; कारण त्या विधवा आहेत आणि आदिवासी जमातीच्या आहेत. हाच का तुमचा सनातन धर्म? आम्ही या विरोधात आमचा आवाज उठवत राहू, असे विधान तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केले आहे. उदयनिधी स्टॅलिन येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

संपादकीय भूमिका 

प्रत्येक गोष्टीला सनातन धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करणार्‍या उदयनिधी यांना सनातन धर्मद्वेषाची काविळ झाली आहे, असेच यातून दिसून येते !