एन्.आय.ए.ने कॅनडात लपलेल्या ४३ आतंकवादी आणि गुंड यांचा तपशील प्रसारित करून मागितली माहिती !

नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) कॅनडाशी संबंध असणार्‍या ४३ आतंकवादी आणि गुंड यांच्याविषयाचा तपशील प्रसारित केला आहे. ‘संबंधित आरोपींच्या संपत्तींविषयीची माहिती लोकांनी आम्हाला द्यावी’, असे आवाहन एन्.आय.ए.कडून करण्यात आले आहे. ही संपत्ती केंद्रशासनाकडून कह्यात घेतली जाऊ शकते. लॉरेन्स बिश्‍नोई, जसदीप सिंग, काला जठेडी उपाख्य संदीप, वीरेंद्र प्रताप उपाख्य  काला राणा, जोगिंदर सिंह यांच्यासह इतरही सर्व गुन्हेगारांचा तपशील छायाचित्रांसह प्रसारित केला आहे. यातील अनेक गुंड कॅनडात स्थायिक असल्याचे एन्.आय.ए.ने म्हटले आहे. एन्.आय.ए. यासाठी  ७२९०००९३७३ हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकही प्रसारित केला आहे.

संपादकीय भूमिका 

कॅनडा सरकारकडे या आतंकवाद्यांवर कारवाई करून भारतात सोपवण्याची मागणी करूनही ती नाकारण्यात आली आहे. यातून कॅनडाचे सरकार कशा प्रकारे आतंकवाद्यांना पाठीशी घालत आहे, हे लक्षात येते !