प्रभु श्रीराम आणि महाराणा प्रताप यांचा अवमान : महंमद शाकिब अहमद याला अटक !

असा अवमान जर अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांचा करण्यात आला असता, तर  पोलिसांनी स्वत:हून त्वरित कारवाई केली असती ! बहुसंख्य हिंदू असा धाक पोलीस आणि सरकारी व्यवस्था यांच्यात कधी निर्माण करणार ?

भारतासमवेतचे भक्कम संबंध श्रीलंकेच्या विकासासाठी महत्त्वाचे ! – श्रीलंका

भारतासमवेत भक्कम नाते निर्माण करतांना चीनला दूर ठेवणे आणि श्रीलंकेतील तमिळ हिंदूंचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. श्रीलंकेने त्याविषयी भारताला आश्‍वस्त करून कृती करावी !

लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांची ‘ईडी’कडून चौकशी होणार !

ही प्रकरणे वर्ष २००७ पासूनची आहेत. यांतील ४० पैकी ३३ जणांवर आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे. आणखी ५ जणांवर लवकरच आरोपपत्र प्रविष्ट करण्यात येईल. अनधिकृत तुकड्यांना मान्यता देणे, चुकीचे शालार्थ ‘आयडी’ देणे आदी प्रकार या प्रकरणात झाले आहेत.

श्रीलंकेने तमिळांच्या प्रश्‍नांवर बोलावली सर्वपक्षीय बैठक !

श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी देशातील अल्पसंख्य तमिळांच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. त्यांनी सर्व पक्षांना या संदर्भातील चर्चेत सहभागी होऊन यावर एकमत निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.

‘कोचिंग क्लास’ घेणार्‍या अनेकांनी शाळांच्या मान्यता घेतल्या आहेत ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

लोकप्रतिनिधींनी राज्यात ‘कोचिंग क्लास’चे पेव फुटले आहे. शाळा चालू असतांना कोचिंग क्लास घेण्यात येतात. त्यामुळे शाळा ओस पडत असल्याचे सभागृहात सांगितले.

सर्पदंशावरील संपूर्ण उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून करावेत !

रुग्णाला ‘व्हेंटिलेटर’वर ठेवल्याचे सिद्ध झाले, तरच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून साहाय्य मिळते, हे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर अध्यक्षांनी असे निर्देश दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ गावे पूरग्रस्त : २३२ नागरिकांचे स्थलांतर

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून हवामान विषयक मिळालेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यात २७ जुलैपर्यंत मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तुळजापूर मंदिरातील गहाळ दागिन्यांची सरकारने त्वरित चौकशी करावी ! – आमदार मंदा म्हात्रे, भाजप

महाराष्ट्राची कुलदेवता तुळजापूर मंदिरतील भवानीदेवीचे पुरातन दागिने आणि वस्तू गहाळ झाल्या आहेत. हे दागिने पुन्हा मिळवण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करण्याचा आदेश द्यावा.

महाराष्ट्रात ‘ऑनलाईन गेमिंग’द्वारे चालणार्‍या जुगारावर बंदी घालावी ! – आमदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेस

बहुतांश ‘ऑनलाईन’ खेळ हे पैसे लावून खेळले जातात. हा एक प्रकारे अधिकृत करण्यात आलेला जुगारच नव्हे का ? ‘ऑनलाईन’ खेळांचा अपलाभ धर्मांध, तसेच अन्य गुन्हेगार घेत आहेत.

विद्यार्थ्यांना ‘पेस्ट्री’च्या दुकानांतून अमली पदार्थांची विक्री ! – आमदार वेंझी व्हिएगस, गोवा

विद्यार्थ्यांना ‘पेस्ट्री’च्या दुकानांतून अमली पदार्थांची विक्री होत आहे. काही ‘पेस्ट्री’ दुकाने मारिजुआना हे अमली पदार्थ असलेले ‘ब्राऊनीस’ आणि ‘केक’ यांची विक्री करत आहेत. अशा दुकानांवर पोलिसांनी धाड टाकावी.