तुळजापूर मंदिरातील गहाळ दागिन्यांची सरकारने त्वरित चौकशी करावी ! – आमदार मंदा म्हात्रे, भाजप

आमदार मंदा म्हात्रे

मुंबई – महाराष्ट्राची कुलदेवता तुळजापूर मंदिरतील भवानीदेवीचे पुरातन दागिने आणि वस्तू गहाळ झाल्या आहेत. हे दागिने पुन्हा मिळवण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करण्याचा आदेश द्यावा. हे पुरातन दागिने महाग आहेत. ही चौकशी त्वरित पूर्ण करून देवीचे दागिने शोधून काढावेत, अशी मागणी भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी २७ जुलै या दिवशी विधानसभेत औचित्याच्या सूत्राच्या अंतर्गत केली.