लाचखोर अधिकारी पुन्हा कार्यरत होतात, यासाठी कायद्यात पालट करण्याविषयी अभ्यास करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांना ९ मासानंतर पुन्हा कार्यकारी पदावर नियुक्त केले जाते. त्याच पदावर येऊन ते पुन्हा अपहार करतात.

‘मोबाईल गेमिंग’च्या माध्यमातून धर्मांतर, भारताच्या सुरक्षेला धोका ! – आमदार नीतेश राणे, भाजप

सीमा हैदर ‘ऑनलाईन’ ओळखीतूनच भारतात आली. मोबाईल गेमिंगच्या माध्यमातून लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या धोका निर्माण झाला असून यातून भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

अनाथ मुलांना उच्च शिक्षणातील सर्व अभ्यासक्रमांमध्ये सामावून घेऊ ! – आदिती तटकरे, महिला व बालकल्याणमंत्री

वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या अनाथ मुला-मुलींना शासकीय नोकरीमध्ये १ टक्का आरक्षण दिलेले आहे. त्यांना नोकरीसाठी अनेक सवलतीही देण्यात आलेल्या आहेत, तसेच त्यांना सर्व उच्च शिक्षणातील अभ्यासक्रमामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करू.

मणीपूरमध्ये पुन्हा गोळीबार !

मणीपूरच्या थोरबांग आणि कांगवे येथे हिंदु मैतेई समाज अन् ख्रिस्ती कुकी समाज समोरासमोर येऊन पुन्हा गोळीबार आणि हिंसाचार झाला. तत्पूर्वी २६ जुलैला म्यानमारच्या सीमेवर गोळीबार आणि जाळपोळ करण्यात आली.

जागतिक उपासमारी सूचकांकामध्ये पाकिस्तान ९९ व्या स्थानावर !

जागतिक उपासमारी सूचकांकामध्ये (ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये) पाकिस्तान १२१ देशांच्या सूचीमध्ये ९९ व्या स्थानी गेला आहे.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ४ ॲागस्टपर्यंत चालू रहाणार ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

२ आणि ३ ऑगस्ट या दिवशी शासकीय कामकाज, विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव आणि ४ ऑगस्ट या दिवशी शासकीय कामकाज आणि अशासकीय कामकाजांचे ठराव होणार आहेत.

देहलीतील अनधिकृत मशिदींवरील कारवाईला देहली उच्च न्यायालयाकडून स्थगिती

देहलीतील बाबर रोड येथील बच्चू शाह मशीद (बंगाली मार्केट मशीद) आणि टिळक रेल्वे पुलाजवळील तकिया बब्बर शाह मशीद यांच्यावर कारवाई करण्यास देहली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

(म्हणे) ‘महाविद्यालयातील हिंदु विद्यार्थिनींचे अश्‍लील व्हिडिओ बनवल्याची घटना फारच लहान !’ – गृहमंत्री डॉ. जी परमेश्‍वर

कर्नाटकमध्ये काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंंना हे विधान मान्य आहे का ? आरोपी मुसलमान आणि पीडित हिंदु विद्यार्थिनी असल्यानेच काँग्रेसचे मंत्री असे विधान करत आहेत. याउलट स्थिती असती, तर एव्हाना दोषींवर कठोर कारवाई झाली असती !

महाराष्ट्रात वाघांची संख्या १९० वरून ५०० झाली ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

वाघांची संख्या वाढत चालल्याने ‘वाघ घेता का वाघ ?’, असे म्हणण्याची वेळ आली आहे. पिंजर्‍यातही वाघ आणि बिबटे यांची संख्याही प्रचंड वाढली आहे, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनंटीवार यांनी विधान परिषदेत केले.

केंद्रीय मंत्र्यांना अश्‍लील ‘व्हिडिओ कॉल’ करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारे २ धर्मांध अटकेत !

केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांना अश्‍लील ‘व्हिडिओ कॉल’ करून त्याद्वारे त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणारे महंमद वकील आणि महंमद साहिब या दोघांना देहली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली.