मुंबई – ‘कोचिंग क्लास’ (शिकवणीवर्ग) घेणारेच आता शाळा आणि महाविद्यालये यांच्या मान्यतेची मागणी करत आहेत. राज्यात अनेकांनी अशा मान्यता घेतल्याही आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ जुलै या दिवशी विधानसभेत दिली. शिक्षणक्षेत्रातील अपप्रकाराविषयी सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या एका तारांकित प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी वरील माहिती दिली.
याविषयी लोकप्रतिनिधींनी राज्यात ‘कोचिंग क्लास’चे पेव फुटले आहे. शाळा चालू असतांना कोचिंग क्लास घेण्यात येतात. त्यामुळे शाळा ओस पडत असल्याचे सभागृहात सांगितले.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे टाळण्यासाठी अनुदानित शाळांमध्ये ५०-६० टक्के उपस्थिती अनिवार्य करणे आवश्यक आहे. त्याविषयी शिक्षणविभागाला सूचना देण्यात येतील.