भाजपच्‍या १५२ जागा निवडून येतील ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्‍यक्ष, भाजप

वर्ष २०२४ मध्‍ये होणार्‍या राज्‍याच्‍या निवडणुकांमध्‍ये भाजपच्‍या ८० टक्‍के म्‍हणजे १५२ जागा निवडून येतील. भाजप क्रमांक १ चा पक्ष असेल आणि महायुतीचे २०६ पेक्षा अधिक आमदार निवडून येतील.

पुणे महापालिकेच्‍या पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्‍यास लाच घेतांना अटक !

महापालिकेच्‍या पाणीपुरवठा विभागातून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्‍यासाठी ‘मीटर रिडर’ कर्मचारी उमेश कवठेकर याला २५ सहस्र रुपयांची लाच स्‍वीकारतांना अटक करण्‍यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चतु:श्रृंगी पाणीपुरवठा विभागात केली.

हिंदुत्‍वनिष्‍ठ हरि पाटणकर यांचा महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश !

प्रवेश केल्‍यावर श्री. हरि पाटणकर म्‍हणाले, ‘‘प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ, मराठी माणसांच्‍या भल्‍यासाठी, महाराष्‍ट्राच्‍या विकासासाठी, तसेच अनेक आंदोलने करून सामान्‍य माणसाला न्‍याय मिळवून देण्‍यासाठी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष असल्‍याने मी त्‍यात सहभागी होण्‍याचा निर्णय घेतला आहे.’’

वर्तमान राजकीय परिस्थितीने छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे संपूर्ण देशात हसे केले ! – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

जिल्ह्यातील नाणारचा प्रकल्प ५ दिवसांत बारसूला हालवला जातो. एवढ्या मोठ्या प्रकल्पाला लागणारी जमीन ५ दिवसांत कुठून मिळाली? आज अशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात लुटमार चालू आहे.

गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमणाविषयी विस्तृतपणे चर्चा करू ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

समितीच्या वतीने श्री. ठाकरे यांना ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. ‘हलाल अर्थव्यवस्थेविषयी आम्ही प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहोत’, असे त्यांनी सांगितले.

अब्जाधीश इलॉन मस्क यांनी ‘चॅटजीपीटी’शी स्पर्धा करण्यासाठी स्थापन केले ‘एक्सएआय’ आस्थापन !

‘ओपन एआय’चे चॅटजीपीटी आणि गूगलचे ‘बार्ड’ या प्रणाली अशा आहेत, ज्यांना आपण कोणताही प्रश्‍न विचारला, तरी त्याला ते अचूकतेच्या जवळ नेणारी उत्तरे देतात.

मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला उर्दू भाषेत धमकीचा संदेश !

काही दिवसांपूर्वी भारतातील एका तरुणाच्या प्रेमात पडलेली एक पाकिस्तानी महिला तिच्या मुलांसह भारतात पळून आली होती. या पार्श्‍वभूमीवर ही धमकी देण्यात आली आहे.

हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने ‘धार्मिक शिक्षण आणि अध्यात्मिक साधना’ या कार्यक्रमाचे आयोजन !

हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने राज्यातील हवेरी जिल्ह्यात असलेल्या कोडियाला होस्पेट या गावी तपोक्षेत्र पुण्यकोटी मठात ‘धार्मिक शिक्षण आणि आध्यात्मिक साधना’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यमुनेच्या पाण्यामुळे राष्ट्रीय राजधानीत हाहा:कार !

देहलीतील सखल भाग पाण्याखाली गेला असून लाल किल्ल्याच्या भागातही पाणी घुसले आहे. यासह अनेक ठिकाणी रस्त्यावरील ट्रक आणि बस जवळपास पूर्णच बुडाल्या आहेत.