मुंबई – वर्ष २०२४ मध्ये होणार्या राज्याच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या ८० टक्के म्हणजे १५२ जागा निवडून येतील. भाजप क्रमांक १ चा पक्ष असेल आणि महायुतीचे २०६ पेक्षा अधिक आमदार निवडून येतील. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपावरून वाद होणार नाहीत. १० अपक्ष आमदार आमच्या समवेत आहेत, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. वरील वक्तव्यामुळे ‘शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत’, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘लोकसभा निवडणुकीत भाजपला ३५० पेक्षा जास्त जागा मिळतील. महाराष्ट्रात ४५ पेक्षा जास्त जागा मिळतील. पंकजा मुंडे बीड लोकसभा मतदारसंघात जोरदार सिद्धता करत आहेत’, असेही ते या वेळी म्हणाले.