पुणे – महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यासाठी ‘मीटर रिडर’ कर्मचारी उमेश कवठेकर याला २५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चतु:श्रृंगी पाणीपुरवठा विभागात केली. तक्रारदार हे परवानाधारक प्लंबर (अग्रणी कामगार) आहेत. कवठेकर याने २ वरिष्ठ अधिकार्यांसाठी प्रत्येकी १० सहस्र रुपये, तर स्वत:साठी ५ सहस्र रुपयांची मागणी केली होती.
संपादकीय भूमिकातळागाळापर्यंत मुरलेला भ्रष्टाचार संपवण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर शिक्षा द्यायला हवी ! |