गोवा : अतीवेगवान चारचाकी वाहनाच्या धडकेने ३ वाहनांची हानी

रस्त्याच्या कडेला असलेल्या भ्रमणध्वनी मनोर्‍याला धडकण्यापूर्वी या वाहनाने आणखी २ वाहनांचीही हानी केली. सर्व घायाळांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

गोव्यात प्रतिदिन होतो किमान एक जीवघेणा अपघात !

‘वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी दंड अधिक प्रमाणात आकारण्यात येऊनही अपघात थांबलेले नाहीत. नागरिकांना रस्ता सुरक्षेसंबंधी शिक्षण देण्याची आज आवश्यकता आहे’ – पोलीस महासंचालक जसपाल सिंह

गोवा : कोकण रेल्वे महिला पोलिसांनी रेल्वेस्थानकावर सापडलेली बॅग केरळच्या विद्यार्थिनीला केली परत !

कोकण रेल्वेच्या मडगाव स्थानकावर सापडलेली ४० सहस्र रुपयांचा ऐवज असलेली बॅग २ महिला पोलिसांनी प्रामाणिकपणे केरळ येथील विद्यार्थिनीला परत केली. त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

एकमेवाद्वितीय सनातन प्रभात !

‘सौ सुनार की एक लुहार की ।’, अशी हिंदीत एक म्हण आहे. तिचा अर्थ आहे, ‘सोनाराच्या १०० घावांनी जसे काम होते, तसे लोहाराच्या एका घावाने होते.’ तसेच सनातन प्रभात नियतकालिकांच्या संदर्भात आहे. सनातन प्रभातचे काही सहस्र वाचक जे राष्ट्र-धर्माचे कार्य करत आहेत, तसे लाखो वाचक असलेल्या दैनिकांचे वाचक करू शकत नाहीत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

समीर वानखेडे यांना २३ जूनपर्यंत अटक करू नये !

‘अटकेपासून दिलेला अंतरिम दिलासा रहित करा’, अशी मागणी सीबीआयने उच्‍च न्‍यायालयाकडे केली होती. ‘याचिकेत सुधारणा करण्‍याची अनुमती द्यावी’, अशी मागणी समीर वानखेडे यांच्‍या अधिवक्‍त्‍यांनी आता न्‍यायालयात केली आहे.

सातारा येथे गुरुपौर्णिमा विशेष स्‍मरणिकेचे पू. योगेशबुवा रामदासी यांच्‍या हस्‍ते प्रकाशन !

या वेळी सनातनच्‍या कार्याला आशीर्वाद देताना समर्थभक्‍त पू. योगेशबुवा रामदासी म्‍हणाले की, राष्‍ट्र आणि धर्म जागृतीचे सनातन संस्‍थेचे कार्य मोठे आहे. हिंदूंमध्‍ये स्‍वधर्म, स्‍वभाषा, स्‍वराष्‍ट्राभिमान रुजवण्‍याचे कार्य सनातन संस्‍था करत आहे.

सांगली येथील रिलायन्‍स ज्‍वेल्‍स दरोड्यातील संशयितांची रेखाचित्रे सिद्ध !

मिरज रस्‍त्‍यावरील मार्केट यार्डजवळील वसंत कॉलनीतील रिलायन्‍स ज्‍वेल्‍स या शोरूमवर टाकलेल्‍या दरोड्यात दरोडेखोरांनी १४ कोटी रुपयांचे सोने, हिरे आणि रोकड चोरली होती.

छत्रपती संभाजीनगर येथे एकाच वेळी १ सहस्र १९८ ग्रामपंचायत सदस्‍य अपात्र !

एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत सदस्‍य अपात्र असणे गंभीर आहे ! अशांना सदस्‍यत्‍व कुणी दिले ? सदस्‍यत्‍व देणार्‍यांचीही चौकशी होेणे आवश्‍यक !

पुणे येथे सनातन संस्‍थेच्‍या वतीने ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ पार पडले !

उपाशीपोटी रुग्‍णांची तपासणी कशी करावी ?, बिंदूदाबनाची तात्त्विक माहिती, हात-पाय यांवरील प्रत्‍येक बिंदूचे कार्य, मणक्‍याचा आजार बिंदूदाबनाद्वारे कसा न्‍यून करावा ? या विषयावर डॉ. जोशी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.

हिंदूंचा उद्रेक !

भारतभरातील हिंदुद्वेषी घटनांतून बोध घेऊन सर्वत्रच्या हिंदूंनी त्यांचे संघटन बळकट करावे !