गोवा : अतीवेगवान चारचाकी वाहनाच्या धडकेने ३ वाहनांची हानी

तीन पर्यटक घायाळ

कुडतरी – कुडतरी जंक्शनजवळ एका अतीवेगवान चारचाकी वाहनाने अन्य ३ वाहनांना धडक दिली. या धडकेमुळे एक टॅक्सी उलटल्याने ३ पर्यटक घायाळ झाले. हे चारचाकी वाहन ग्राहकांना घेण्यासाठी दाबोळी विमानतळाकडे जात होते. रस्त्याच्या कडेला असलेल्या भ्रमणध्वनी मनोर्‍याला धडकण्यापूर्वी या वाहनाने आणखी २ वाहनांचीही हानी केली. सर्व घायाळांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.