पणजी – राज्यात मागील १३१ दिवसांमध्ये (जानेवारी २०२३ ते ११ मे २०२३ पर्यंत) सुमारे १ सहस्र ६१ अपघात झाले आहेत. यामध्ये १३० जणांनी प्राण गमावला आहे, तर १२७ जण गंभीररीत्या घायाळ झाले आहेत. प्राण गमावलेल्या बहुतेक जणांना डोक्याला इजा पोचली होती. हा आकडा गतवर्षी या कालावधीत झालेल्या अपघातांच्या तुलनेत दुप्पट आहे.
ALL OF GOA IS A ‘BLOODY’ #ACCIDENT BLACK SPOT
Read:https://t.co/XIVkzRF1yf#Goa #News #Headlines pic.twitter.com/FqzMGjqfPo— Herald Goa (@oheraldogoa) May 2, 2023
राज्यातील अपघातांविषयी वाहतूकमंत्री गुदिन्हो यांच्याकडून चिंता व्यक्त
मंत्री गुदिन्हो पुढे म्हणाले, ‘‘रस्त्यांमुळे अपघात होत असल्याची टीका होत असल्याने रस्त्यांची दुरुस्ती केली आणि याचा उलट परिणाम म्हणून वाहनचालकांनी वाहनाचा वेग आणखी वाढवला. गोव्यातील अधिकाधिक अपघात हे बेदरकारपणे वाहन चालवल्यानेच होत आहेत.
(सौजन्य : Goan Reporter News)
वाहतूक अधिकारी स्वतंत्रपणे कडक कारवाई करण्याची मोहीम राबवत आहे; मात्र तरीही प्रश्न सुटणार नसल्याने नव्याने प्रशिक्षण देणे, समज देणे यांसारखे अजून प्रयत्न करावे लागणार आहेत.’’
रस्त्यावरील जीवघेणे अपघात ही चिंतेची गोष्ट असून रस्ता सुरक्षेविषयी शिक्षण देणे महत्त्वाचे ! – पोलीस महासंचालक जसपाल सिंह
राज्यातील वाढत्या अपघातांच्या संदर्भात पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांनी नुकतीच राज्यातील वरिष्ठ वाहतूक अधिकार्यांसोबत बैठक घेऊन रस्त्यावरील जीवघेण्या अपघातांविषयी चिंता व्यक्त केली. ‘वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी दंड अधिक प्रमाणात आकारण्यात येऊनही अपघात थांबलेले नाहीत. नागरिकांना रस्ता सुरक्षेसंबंधी शिक्षण देण्याची आज आवश्यकता आहे’, असे त्यांनी सांगितले.
Road fatalities still a concern, road safety edu needed: DGP https://t.co/Bc9QX2yWqP
— TOI Goa (@TOIGoaNews) May 15, 2023
चालक परवाना घेणार्यांना ‘ओरिएंटेशन कोर्स’ बंधनकारक
राज्यशासनाने गोवा मोटर वाहन कायद्यात सुधारणा केली असून यापुढे चालक परवाना घेण्यासाठी अर्ज करणार्यांना राज्य सरकार नियुक्त संस्थांकडून ‘ओरिएंटेशन कोर्स’ घेणे बंधनकारक असणार आहे.