नाशिक येथे कंटेनरच्या धडकेत २ जैन साध्वींचा मृत्यू !

अपघातात मृत्यू झालेल्या २ जैन साध्वीं , कंटेनर

नाशिक – मुंबई-नाशिक महामार्गावर इगतपुरी परिसरात कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात २ जैन साध्वींचा मृत्यू झाला. कंटेनरने प्रथम पिकअप, ओमनी गाडी आणि नंतर पायी चालणार्‍या साध्वींना धडक दिली. नाशिकला चातुर्मास करण्यासाठी त्या दोघी पायी जात होत्या.