दौंड शहरातून २ सहस्र ४२८ किलो गोमांस जप्त; ३ धर्मांधांसह एकाला अटक !

(प्रतिकात्मक चित्र)

दौंड (जिल्हा पुणे) – पुणे ग्रामीण पोलिसांच्या ४ पथकांनी दौंड शहरात केलेल्या कारवाईत ३ लाख ८८ सहस्र रुपयांचे २ सहस्र ४२८ किलो गोमांस जप्त केले आहे. या कारवाईत गोमांस विक्री करणारे शाहरूख कुरेशी, निसार कुरेशी, आयर्विन डिक्रूज, सादीक कुरेशी यांना अटक करण्यात आली आहे, तसेच ९ जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. फैजान कुरेशी हा गोहत्या करून सदर गोमांस जमील इस्माईल कुरेशी याच्याकडे विक्रीसाठी देत असल्याची माहिती अन्वेषणात पुढे आली आहे.

संपादकीय भूमिका 

गोहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही न होण्याचा परिणाम ! आतातरी गोहत्या करणार्‍यांना कठोर शिक्षा होणार का ?