शरद पवार यांना धमकी दिल्याप्रकरणी २ जणांवर गुन्हा नोंद !

संजय राऊत यांना धमकी देणारे दोघे कह्यात !

शरद पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सामाजिक माध्यमावरून धमकी दिल्याप्रकरणी नर्मदाबाई पटवर्धन आणि सौरभ पिंपळकर यांच्यावर विविध कलमांअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखा पुढील अन्वेषण करत आहेत, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जिवे मारण्याची धमकी देणार्‍या दोघांना कह्यात घेण्यात आले आहे.

सुप्रिया सुळे धमकीप्रकरणी तक्रार प्रविष्ट करताना

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘राजकारण महाराष्ट्राचे’ या नावाच्या ‘ट्विटर’ गटावर ‘तुमचा दाभोळकर करू’, अशा आशयाची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ९ जून या दिवशी मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन धमकीप्रकरणी तक्रार प्रविष्ट केली होती. पवार यांना धमकी देणारा आरोपी भाजपशी संबधित असल्याचे म्हटले जात आहे.

संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दूरभाष करून गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात अजून गुन्हा नोंद झाला नाही. राऊत यांच्याकडून या प्रकरणी कोणतीही तक्रार आली नाही. कह्यात घेण्यात आलेले दोघे जण गोवंडी येथील आहेत. नशेच्या धुंदीत त्यांनी ही धमकी दिली असल्याची प्राथमिक माहिती आहे.