कोल्हापूर येथे हिंदु युवतीस पळवणार्‍या धर्मांधास अटक

कोल्हापूर – येथील अल्पवयीन हिंदु मुलीस फूस लावून पळवून नेल्याच्या प्रकरणी करवीर पोलिसांनी इमदाद बशीर नायकवाडीला या धर्मांधाला अटक केली आहे. या प्रकरणी इमदान नायकवडी याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्याच्या अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी युवतीच्या आईने तक्रार दिली आहे. (‘लव्ह जिहाद’च्या घटनांची व्याप्ती आणि वारंवारता पहाता त्याविरोधात कठोर कायद्याचीच आवश्यकता आहे ! – संपादक) या संदर्भात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पतीशी पटत नसल्याने वर्ष २०१३ पासून मी, मुलगी आणि आई असे विभक्त रहात आहोत. ऑक्टोबर २०२२ मध्ये इमदाद माझ्या घरी आला आणि माझ्यासमवेत मुलीला पाठवून द्या, अन्यथा मी तुम्हाला आणि तिला मारून टाकीन अशी धमकी दिली. रात्री पुन्हा येऊन धमकी दिली. यानंतर काही कालावधी गेल्यानंतर माझ्या मुलीने मला दूरभाष करून ती लक्षतीर्थ वसाहत येथे इमदाद समवेत रहात असल्याचे कळवले. त्या वेळी मी तिला घरी परत घेऊन आले. यानंतर परत इमदाद माझ्या घरी येऊन तिला त्याच्या घरी बळजोरीने घेऊन गेला. गेल्या काही दिवसांपासून मुलगी मला दूरभाष करून ‘इमदाद तिला सतत मारहाण करतो, बाहेर पडू देत नाही, शेजार्‍यांशी बोलू देत नाही’, अशी तक्रार करत होती. वर्ष २०२१ मध्येही इमदाद याने माझ्या मुलीला फूस लावून पळवून नेले होते. त्या वेळी त्याच्यावर गुन्हा नोंद झाला होता. (त्याच वेळी नायकवाडी याला अटक केली असती, तर आज ही वेळ आली नसती. पोलिसांनी आतापर्यंत लव्ह जिहादच्या तक्रारी गांभीर्याने न घेतल्यानेच हिंदूंवर ही वेळ आहे ! अशा पोलिसांनाही शासन झाले पाहिजे ! – संपादक)

या प्रकरणी प्रथम पोलीस गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ करत होते. ही घटना हिंदुत्वनिष्ठांना समजल्यावर ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. (हे पोलीस भारताचे कि पाकचे ? – संपादक)

संपादकीय भूमिका :

‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना रोखण्यासाठी ‘लव्ह जिहाद’विरोधी कठोर कायदाच आवश्यक !