शिवराज्याभिषेकदिनासाठी बसवली होती मूर्ती
कोल्हापूर – ‘मराठा तितुका मेळवावा’ संघटनेच्या वतीने शिवराज्याभिषेकदिनाच्या निमित्ताने विशाळगड येथे पंत प्रतिनिधीच्या वाड्याच्या परिसरात ३ जूनच्या रात्री ९.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांची ५ फूट उंचीची फायबरची मूर्ती बसवण्यात आली होती. ४ जून या दिवशी पहाटे ही मूर्ती गायब असल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष श्री. रणजित घरपणकर म्हणाले, ‘‘या संदर्भात संस्थेने पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे मूर्ती चोरीस गेल्याची तक्रार दिली आहे. वास्तविक ही मूर्ती प्रशासनानेच अनुमती नसल्याच्या कारणावरून काढली आहे. एकीकडे विशाळगडावर असलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात प्रशासन कोणतीच कारवाई करत नाही आणि दुसरीकडे शिवराज्याभिषेकदिनासाठी बसवलेली मूर्ती काढण्यात येत आहे, हे गंभीर आहे.’’