अहिल्यानगर (नगर) येथे मिरवणुकीत धर्मांधांनी मिरवले क्रूरकर्मा औरंगजेबाचे चित्र !

४ धर्मांधांविरुद्ध गुन्हा नोंद !

अहिल्यानगर  (नगर)  – येथील मुकुंदनगर परिसरात सूफी संत (सुफी हा इस्लाम धर्मातील एक संप्रदाय आहे. लोकरीची घोंगडी पांघरून स्वतःच्या विचारांचा प्रचार करणार्‍या फकिरांना सुफी म्हणतात) दमबारा हजारी यांचा दर्गा आहे. ४ जून या दिवशी या दर्ग्याचा उरुस (मुसलमान सत्पुरुषाच्या पुण्यतिथीनिमित्त होणारा उत्सव) साजरी करण्यात आली. त्या वेळी मुकुंदनगर परिसरातून चादर अर्पण करण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत चक्क औरंगजेबाचे चित्र घेऊन नाचण्याचा प्रकार घडला.

या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातीले पोलीस कर्मचारी सचिन नवनाथ धोंडे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘फकीरवाडा परिसरात ४ जून या दिवशी दम बारा हजारी दर्ग्याजवळ निघालेल्या सदल उरुस मिरवणुकीमध्ये काही जणांनी संगनमताने औरंगजेबाची प्रतिमा असलेले फलक हातामध्ये घेत प्रदर्शन करून ‘बाप तो बाप होता है, बेटा तो बेटा होता है’ अशा घोषणा देत २ समाजांत जातीय तेढ निर्माण होईल अन् द्वेष पसरेल असे कृत्य केले आहे.’ या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महंमद सर्फराज इब्राहिम सय्यद उपाख्य सर्फराज जहागिरदार, अफनान शेख, शेख सरवर आणि जावेद शेख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्यांना कह्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. औरंगजेबाचे चित्र जर कुणी झळकवत असेल, तर हे मान्य केले जाणार नाही. या देशामध्ये, तसेच महाराष्ट्रामध्ये आमचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असू शकतात. कुणी औरंग्याचे नाव घेत असेल, तर त्याला त्या ठिकाणी क्षमा नाही. (हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍या धर्मांधांना तात्काळ उपमुख्यमंत्र्यांनी शिक्षा करावी, अशी हिंदूंची अपेक्षा ! – संपादक)

भाजपचे आमदार नीतेश राणे यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, राज्यात काही भागांत अशा प्रकारच्या जिहादी विचारांचे लोक आहेत. ते पाकिस्तानच्याही घोषणा देतात; पण त्यांनी लक्षात घ्यावे की, आता महाविकास आघाडीचे सरकार नाही. यापुढे असे प्रकार चालणार नाहीत. ते पुन्हा असे धाडस करणार नाहीत, याची काळजी आम्ही घेऊ.

संपादकीय भूमिका

  • ज्या औरंगजेबाने सहस्रो मंदिरे उद्ध्वस्त केली, हिंदवी स्वराज्यावर आक्रमणे करून हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, छत्रपती संभाजी महाराज यांना हालहाल करून मारले, हिंदूंची शेकडो मंदिरे पाडून मशिदी बांधल्या अशा हिंदुद्वेष्ट्या औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍यांवर तात्काळ कठोर कारवाईच हवी !
  • क्रूरकर्मा टिपू सुलतान, अझफलखान आणि औरंगजेब या हिंदुद्वेष्ट्या आक्रमकांचे उदात्तीकरण करणारे उद्या त्यांच्याप्रमाणे वागू लागल्यास आश्‍चर्य वाटू नये ! त्यामुळे अशांना सरकारने वेळीच कारागृहात डांबणे आवश्यक आहे !