शिक्षणक्षेत्रासाठी लज्जास्पद !
नाशिक – येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या घरासह अधिकोषातील लॉकर्सची झाडाझडती चालू आहे. धनगर यांच्या पहिल्याच ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या खात्यातून १२ लाख ७१ सहस्र रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्या घरातून ८५ लाख रुपयांसह ३२ तोळे सोने हस्तगत करण्यात आले होते. अद्यापही २ अधिकोषातील खात्यांसह लॉकरचे अन्वेषण चालू आहे.
नाशिकसह जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाईची धडक मोहीम चालूच आहे. जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना ३० लाख रुपयांची लाच घेतांना पथकाने कह्यात घेतले होते. त्यांनरत नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागातून शिक्षणाधिकारी सुनीता धनगर ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना रंगेहात अटक करण्यात आली होती.
संपादकीय भूमिकालाचखोर शिक्षणाधिकारी असणार्या शिक्षण विभागातून विद्यार्थ्यांना भ्रष्टाचाराचेच धडे मिळाल्यास नवल ते काय ? |