#Exclusive : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच दिव्यांग आणि वृद्ध यांना घरबसल्या मतदान करता येणार !

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अशा प्रकारे प्रथमच प्रयोग केला जात आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये दिली.

गोवा : मुसलमानांनी गोव्यातून पळवून नेलेल्या २ अल्पवयीन मुलींची हुब्बळ्ळी येथून सुटका

तक्रार प्रविष्ट झाल्यानंतर ४८ घंट्यांत गोवा पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. या दोन्ही मुली हिंदु धर्मीय होत्या का ? याची माहिती मिळू शकलेली नाही.

गोवा : शासनाकडून पणजी परिसर, तसेच पणजी ते बाणस्तारी आणि पणजी ते झुआरी पूल या मार्गांवर वाहनांसाठी वेगमर्यादा अधिसूचित

उत्तर गोवाचे जिल्हा दंडाधिकारी यांनी वाहनांसाठी वेगमर्यादा त्वरित प्रभावाने अधिसूचित केली आहे. ती देत आहोत.

सिंधुदुर्गात पोलीस भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर करणार्‍या दोघांवर गुन्हा नोंद

बनावट प्रमाणपत्र सादर करणारे, हे पोलीस खात्यात भरती होऊ पहाणारे गुन्हेगारच !

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील २३ देवस्थानांचा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित होणार

कुडाळ शहरातील श्री देव कुडाळेश्‍वर मंदिरासह तालुक्यातील प्रमुख २३ देवस्थानांच्या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याविषयी भाजपचे माजी खासदार नीलेश राणे यांनी मागणी केली होती.

गोव्यात आजपासून स्मार्ट सिग्नल कार्यान्वित होणार

हा उच्च तंत्रज्ञान असलेला कॅमेरा आहे. तो इन्फ्रारेड तंत्रज्ञानाचा वापर करून दिवसा २०० मीटर अंतरावरून आणि रात्री १०० मीटर अंतरावरूनही व्हिडिओ अन् छायाचित्र या माध्यमातून नोंद ठेवतो. ज्या वाहनाने नियमांचे उल्लंघन केले असेल, त्या वाहनाच्या मालकाला दंडाची नोटीस पाठवली जाणार !

सर्वच क्षेत्रांमधील अधोगती, ही अहिंसावादी महात्मा गांधी आणि काँग्रेस यांची भारताला देणगी !

‘भारतापासून पाकिस्तान आणि बांगलादेश स्वतंत्र होणे, भारतातील धर्मांधांनी ‘काश्मीर पाकिस्तानचा आहे’, असे म्हणणे आणि भारतात सर्वत्र आतंकवादी असणे, ही अहिंसावादी महात्मा गांधी आणि काँग्रेस यांची भारताला देणगी आहे. त्या विचारसरणींना हरवून हिंदु राष्ट्राची स्थापना केल्यावरच भारताची सर्वच क्षेत्रांत प्रगती होईल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

देश अन् धर्म वाचवण्याविषयी हिंदु बोलत असेल, तर ते ‘हेट स्पीच’ होते का ? – अधिवक्ता सुभाष झा, सर्वोच्च न्यायालय

‘भारताचे तुकडे होऊ नयेत, याविषयी हिंदूंनी जनजागृती करणे, हे ‘हेट स्पीच’ आहे का ?’, जर हिंदू ‘आपला देश आणि धर्म वाचवण्याविषयी बोलत असेल, तर ते ‘हेट स्पीच’ आहे का ?’, असा परखड प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता सुभाष झा यांनी उपस्थित केला.

ईश्‍वराची कृपा संपादन करण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्राच्‍या कार्यात सहभागी होऊया ! – सद़्‍गुरु नंदकुमार जाधव

दिंडीत ठिकठिकाणी स्‍वसंरक्षण प्रात्‍यक्षिके दाखवून समाजातील लोकांचे लक्ष वेधून घेत होती. दिंडी मार्गातील व्‍यावसायिक धर्मप्रेमी दिंडीवर फुलांचा वर्षाव करून दिंडीचे स्‍वागत करत होते. व्‍यापार्‍यांनी दिंडीतील सर्वांना पाणीवाटप केले.