भगूर (नाशिक) येथील प्रकार !
भगूर (नाशिक) – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मराठी भाषाशुद्धीचे महद्कार्य केले; पण त्यांचे जन्मस्थळ असलेल्या भगूर येथील पदपथावरील दिशादर्शकांवर लावलेल्या फलकांवरील लिखाण अशुद्ध आहे. त्यामुळे सावरकरप्रेमी संतप्त झाले आहेत. याविषयी भगूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निर्मला गायकवाड यांनी सांगितले की, या फलकांमधील चुकलेल्या नावांत तातडीने पालट करून त्यात सुधारणा केली जाईल. यात कुठलाही विलंब केला जाणार नाही. (फलक बनवतांना तो शुद्धलेखनातील जाणकारांकडून पडताळून का घेतला नाही ? – संपादक)
फलकात असणार्या शुद्धलेखनाच्या चुका !
१. वीर सावरकर यांच्या नावात ‘वीर’ हा शब्द ‘विर’ असा अशुद्ध लिहिला आहे.
२. ‘पालिका’ आणि ‘भगूर’ हे योग्य शब्द अपेक्षित असतांना ‘पालीका, भगुर’ असे अशुद्ध लिहिले आहेत.
संपादकीय भूमिका
|
२८ मे पर्यंत सुधारणा करावी ! – आमोद दातार, सावरकरप्रेमी
याविषयी आमोद दातार यांनी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली आहे; मात्र ‘यावर कार्यवाही करण्यात आली आहे’, असे उत्तर देण्यात आले आहे.
भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या घराबाहेरील पालिकेच्या फलकात अक्षम्य चुका आहेत. ‘वीर’ हा शब्द ‘विर’ असा अशुद्ध लिहिलाय. तसेच ‘पालीका, भगुर’ हे शब्द चुकीचे लिहिले आहेत. स्वा. वीर, भगूर, पालिका असे योग्य रीतीने कृपया लिहावेत. सावरकरांसारख्या भाषाप्रभूच्या घराबाहेर pic.twitter.com/cXNxqMXbMy
— Aamod Datar (@AamodDatar) May 18, 2023
असे असले, तरी प्रत्यक्षात १७ मेपर्यंत यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. ‘वीर सावरकर यांच्या १४० व्या जन्मदिनापर्यंत म्हणजेच २८ मे पर्यंत तरी यात सुधारणा करावी’, असे दातार यांनी म्हटले आहे. (प्रशासनाला हे सांगावे का लागते ? – संपादक)