नेदरलँड्समध्ये ‘द केरल स्टोरी’च्या प्रदर्शनास आरंभ !

नेदरलँड्स येथील खासदार गीर्ट विल्डर्स यांनी दिली माहिती !

अ‍ॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – भारतात अत्यंत लोकप्रिय झालेला ‘द केरल स्टोरी’ चित्रपट आता नेदरलँड्समध्ये पहाता येणार आहे. आइंडहोवन शहरात हा चित्रपट प्रदर्शित व्हायला आरंभ झाला असून २० मेपासून लायसिंदम, अल्मीयर, यूट्रेक्ट आणि हफडर्प या शहरांमध्येही तो प्रदर्शित होईल. हा चित्रपट पहाणे आत्यंतिक आवश्यक असून यातून इस्लाममध्ये धर्मांतर आणि जिहाद यांच्या विरोधात जागृती निर्माण होईल, अशी माहिती येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी ट्वीट करून दिली.

संपादकीय भूमिका

कुठे नेदरलँड्समधील जनतेने चित्रपटाच्या माध्यमातून ‘जिहाद’ विरोधात सतर्क व्हावे, असे वाटणारे खासदार गीर्ट विल्डर्स, तर कुठे जिहादी आतंकवादाने होरपळून निघालेल्या बंगाल राज्यात चित्रपटावर बंदी लादणार्‍या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी !