‘द केरल स्टोरी’च्या चमूकडून ‘अर्श विद्या समाजम्’ला ५१ लाख रुपयांची देणगी !

मुंबई – ‘द केरल स्टोरी’च्या चमूने बांद्य्रातील ‘रंग शारदा’मध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाच्या चमूने केरळमधील ‘अर्श विद्या समाजम्’ या संघटनेला ५१ लाख रुपये दान केले. ही संघटना लव्ह जिहादला बळी पडून धर्मांतर केलेल्या मुलींना स्वधर्मात आणण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी कार्य करते.

‘द केरल स्टोरी’च्या चमूने पत्रकार परिषदेत लव्ह जिहादला बळी पडलेल्या २६ मुलींची करून दिली ओळख !

‘द केरल स्टोरी’च्या चमूने  पत्रकार परिषदेमध्ये लव्ह जिहादला बळी पडलेल्या २६ मुलींची त्यांनी ओळख करून दिली. या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी केरळमधील ‘अर्श विद्या समाजम्’ने या मुलींना पुन्हा स्वधर्मात आणून त्यांच्या केलेल्या पुनर्वसनाविषयीही माहिती दिली. ‘या मुलींच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांतून आम्हाला चित्रपट काढण्याची प्रेरणा मिळाली. भारतात अशांची संख्या अधिक आहे; मात्र यांतील काही जणी आपल्या सोबत आहेत, त्यांचा मी सन्मान करू इच्छितो’, असे ते म्हणाले.