सप्तर्षींच्या आज्ञेने बनवलेल्या सनातनच्या तीन गुरूंच्या चित्राविषयी साधकांना आलेल्या अनुभूती आणि लक्षात आलेला भावार्थ

१.८.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक’ प्रसिद्ध झाला होता. यातील पृष्ठ क्रमांक १ वरील चित्राकडे पाहून साधकांना आलेल्या अनुभूती आणि सुचलेला भावार्थ येथे देत आहोत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या विशेषांकाचे वितरण करतांना आलेली अनुभूती

गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) वर्ष २०२१ च्या ७९ व्या जन्मदिनानिमित्त विशेषांक छापण्यात आले होते. मला त्यांच्या जन्मोत्सवाच्या ७.३.२०२१ च्या विशेषांकाचे वितरण करण्याची सेवा मिळाली.

२० कोटी किमतीचे १ सहस्र ९७० ग्रॅम कोकेन जप्त !

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी ५ एप्रिल या दिवशी मुंबई विमानतळावर अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळीचा अपप्रकार उघड केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आफ्रिकी व्यक्तीसह एकूण तिघांना अटक केली आहे.

यापुढे अनाथ मुलांना मिळणार अपंग व्यक्तींप्रमाणे आरक्षण !

यापूर्वी राज्यशासनाने शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये अनाथ मुलांसाठी खुल्या प्रवर्गातून १ टक्का आरक्षण घोषित करण्यात आले होते. वर्ष २०१८ मध्ये घेतलेल्या या निर्णयामध्ये राज्यशासनाने पालट केला आहे. यापुढे अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गाऐवजी अपंग व्यक्तींप्रमाणे एकूण जागांच्या १ टक्का आरक्षण …

(म्हणे) ‘शारीरिक संबंध हे देवाने मानवाला दिलेल्या सुंदर गोष्टींपैकी एक !’ – पोप फ्रान्सिस

शारीरिक संबंध हे देवाने मानवाला दिलेल्या सुंदर गोष्टींपैकी एक आहे, असे विधान ख्रिस्त्यांचे सर्वाेच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी ‘द पोप आन्सर्स’ (पोप यांची उत्तरे) या माहितीपटासाठी दिलेल्या मुलाखतीत केले.

जोतिबा यात्रेच्या (जिल्हा कोल्हापूर) काळात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे भाविक त्रस्त !

जोतिबा देवाच्या यात्रेच्या काळात जोतिबा डोंगर, तसेच कोल्हापूर बसस्थानक येथे झालेल्या चोरीच्या वाढत्या घटनांमुळे भाविक त्रस्त झाले आहेत. जोतिबाच्या डोंगरावर गळ्यातील साखळी, मंगळसूत्र चोरून नेणे, खिशातील पाकीट चोरून नेणे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ !

राज्यासमवेत शहरात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतांनाच संशयित रुग्णांची कोरोना चाचणी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

श्री हनुमान जयंतीनिमित्त देशभरात ८०० ठिकाणी गदापूजन !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला बळ मिळण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा शौर्य जागृत करणारा उपक्रम !

शहरांची नावे पालटण्याचा अधिकार सरकारचा ! – सर्वोेच्च न्यायालय

‘औरंगाबाद’ शहराचे नाव पालटून ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याच्या निर्णयाविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

(म्हणे) ‘कट्टर हिंदुत्वामुळे भारताचा सामाजिक ढाचा नष्ट होत आहे !’

हिना रब्बानी खार यांनी भारतातील हिंदुत्वाकडे लक्ष देण्याची नसती उठाठेव करण्यापेक्षा गेली ७५ वर्षे जिहादी वृत्तीमुळे संपूर्ण पाकच नष्ट होत चालला आहे, त्याकडे लक्ष दिले, तर त्यांचा देश काही काळ तरी तग धरील !