(म्हणे) ‘शारीरिक संबंध हे देवाने मानवाला दिलेल्या सुंदर गोष्टींपैकी एक !’ – पोप फ्रान्सिस

पोप फ्रान्सिस

नवी देहली – शारीरिक संबंध हे देवाने मानवाला दिलेल्या सुंदर गोष्टींपैकी एक आहे, असे विधान ख्रिस्त्यांचे सर्वाेच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी ‘द पोप आन्सर्स’ (पोप यांची उत्तरे) या माहितीपटासाठी दिलेल्या मुलाखतीत केले. या माहितीपटाची निर्मिती ‘डिस्ने प्रॉडक्शन’ने केली आहे. गेल्या वर्षी रोममध्ये पोप फ्रान्सिस यांनी २० वर्षे वयोगटातील १० तरुणांची भेट घेतली होती. त्यावर हा माहितीपट आधारित आहे. पोप फ्रान्सिस यांनी व्यक्त केलेली मते व्हॅटिकनच्या अधिकृत वृत्तपत्रानेही प्रकाशित केली होती.

१. या माहितीपटामध्ये हस्तमैथुनाविषयी पोप फ्रान्सिस म्हणाले, ‘‘स्वत:ला लैंगिकरित्या व्यक्त करणे, ही समृद्धता आहे; म्हणून खर्‍या लैंगिक अभिव्यक्तीपासून दूर रहाणारी कोणतीही गोष्ट लैंगिकतेची समृद्धता अल्प करते.’’

२. पोप फ्रान्सिस पुढे म्हणाले की, कॅथॉलिक चर्चने समलैंगिक लोकांचे स्वागत केले पाहिजे. सर्व पुरुष ही देवाची मुले आहेत. देव कुणालाही नाकारत नाही. देव पिता आहे. चर्चमधून कुणालाही हाकलून देण्याचा मला अधिकार नाही.

३. पोप पुढे म्हणाले की, गर्भपात करणार्‍या महिलांविषयी दया दाखवली पाहिजे. तथापि ही प्रथा अस्वीकारार्ह आहे. गर्भपाताला पाठिंबा देणे वेगळे आणि गर्भपात या कृतीचे समर्थन करणे वेगळे.

संपादकीय भूमिका 

  • विवाहापूर्वी किंवा विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवणे, हे अनैतिक आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त करणारे आहे. असे होऊ नये, यासाठी हिंदु धर्मात विवाह संस्था हा संयत मार्ग सांगितला आहे !
  • ‘या विधानामुळे आधीच लैंगिक शोषणाचे आरोप असणार्‍या जगभरातील अनेक ख्रिस्ती धर्मगुरूंचे मनोबल वाढेल’, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ?