हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला बळ मिळण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा शौर्य जागृत करणारा उपक्रम !
मुंबई – हिंदूंचा इतिहास हा शौर्य आणि पराक्रम यांचा आहे; मात्र कित्येक वर्षे लढा देऊन मिळवलेल्या स्वातंत्र्यानंतर ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल…’, अशा प्रकारे खोटा संदेश देऊन हिंदूंच्या भावी पिढ्यांना शौर्य गाजवण्यापासून वंचित ठेवले जात आहे. गेल्या ७५ वर्षांत हिंदूंचे शौर्य जागृत होईल, असे कार्यक्रम होतांना दिसत नाहीत. या दृष्टीनेच हिंदूंमध्ये शौर्यजागृती व्हावी आणि प्रभु श्रीरामाच्या कृपेने रामराज्य अर्थात् हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला बळ मिळावे, यासाठी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने देशभरात ८०० ठिकाणी ‘गदापूजन’ करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वरूप !
या कार्यक्रमात प्रारंभी शंखनाद करून सामूहिक प्रार्थना, ‘गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, स्तोत्र आणि ‘श्री हनुमते नम: ।’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. ‘धर्मसंस्थापनेसाठी मारुतिरायांचे गुण कसे आत्मसात करावेत ?’, याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा’ करण्यात आली.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला बळ मिळण्यासाठी श्री #हनुमानजयंती निमित्त देशभरात 800 ठिकाणी गदापूजन !
हिंदूंमध्ये शौर्य जागरण करण्यासाठी गदापूजन आवश्यक ! – @Ramesh_hjs राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती @HinduJagrutiOrg #HanumanJayanti #hanumanjanmotsav #HanumanJayanti2023 pic.twitter.com/SzIRIvPUbU— HJS Mumbai (@HJSMumbai) April 6, 2023
महाराष्ट्रात समर्थ रामदासस्वामींनी स्थापन केलेल्या ११ मारुतींच्या ठिकाणी, तसेच अनेक राज्यांत सामूहिक गदापूजन !
महाराष्ट्रातील समर्थ रामदासस्वामींनी स्थापन केलेल्या ११ मारुतींच्या ठिकाणीही गदापूजन करण्यात आले. यांसह महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नागपूर आणि अमरावती; कर्नाटकात बागलकोट, धारवाड, शिवमोग्गा, उडुपी, दक्षिण कन्नड, मैसुरू, तुमकूर, बेंगळुरू आणि बेळगाव; गोव्यात फोंडा आणि साखळी; उत्तरप्रदेशात मथुरा यांसह देहली आणि राजस्थान येथेही सामूहिक ‘गदापूजन’ उत्साहात पार पडले. या कार्यक्रमांना संतांची वंदनीय उपस्थिती लाभली, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता.
हिंदूंमध्ये शौर्य जागरण करण्यासाठी गदापूजन आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समितीहिंदूंच्या प्रत्येक देवतेचे रूप पाहिले असता देवतेचा केवळ एक हात आशीर्वाद देणारा, तर अन्य सर्व हातांमध्ये विविध प्रकारची अस्त्रे-शस्त्रे आहेत. त्या दृष्टीने देवतांच्या शस्त्रांचे पूजन केल्यास हिंदूंमध्ये शौर्य जागृत होण्यास साहाय्य होईल. यावर्षी श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर अनेक राज्यांत भीषण आक्रमणे झाली. हिंदूंना लक्ष्य करून हिंदूंचे खच्चीकरण करण्यात आले.
या गदापूजनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा हिंदूंना बळ मिळावे, हिंदूंमधील शौर्य धगधगत रहावे, यासाठी सण-उत्सवांच्या वेळी प्रतिकात्मक शस्त्रपूजन झाले पाहिजे, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. |