वास्को येथे भटक्या कुत्र्यांनी महिलेच्या डोक्यासह शरिराला चावे घेतले

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. कुत्र्यांच्या उपद्रवावर शासनाने कठोरतेने पावले उचलणे आवश्यक आहे.श्वानप्रेमी संघटनांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यास गोवा सज्ज !

३७ व्या राष्ट्रीय खेळांच्या आयोजनासाठी गोवा सज्ज आहे. या स्पर्धांसाठी लागणार्‍या पायाभूत सुविधा आधीच सिद्ध आहेत. राहिलेली किरकोळ कामे १५ जुलैपर्यंत पूर्ण होतील, असे गोव्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करणारे गोवा हे पहिले राज्य असेल ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मुख्यमंत्र्यांनी ‘गुरुकुल विश्व ॲप’चे लोकार्पण केले. या ॲपमुळे पूर्वप्राथमिक शाळांची नोंदणी करणे सुविधाजनक तसेच ऑनलाईन नोंदणीद्वारे पूर्वप्राथमिक शाळांना अनुमती देणे सहज शक्य होणार आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयाची वाट पहाणार ! – पी.टी. उषा, अध्यक्षा, भारतीय ऑलिंपिक संघटना

गोवा भेटीवर असलेल्या भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पी.टी. उषा यांना पत्रकारांनी विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘याविषयी केंद्र सरकारच्या निर्णयाची वाट पाहू. केंद्राने यासाठी एक समिती स्थापन केली आहे.

अधोगामी बुद्धीप्रामाण्यवादी !

‘बुद्धीप्रामाण्यवादी पुरोगामी नाही, तर अधोगामी असतात. त्यामुळे ते अधोगतीला जातात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कोंढवा (पुणे) येथील शाळेत आतंकवादी प्रशिक्षण चालू असल्याचे पोलिसांना आधी का लक्षात आले नाही ? – डॉ. रिंकू वढेरा, लेखिका आणि इतिहास तज्ञ

प्रशासनाने या परिसरातील नागरिकांच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक होते. हिंदूंनी जागरूक राहून कुठेही अवैध किंवा अयोग्य कृती होतांना दिसल्यास त्या विरोधात त्वरित आवाज उठवायला हवा.

‘पर्यावरण असमतोल’ कुणामुळे ?

तापमान वाढीला ‘आधुनिक जीवनशैली’ कारणीभूत आहे आणि ती आटोक्यात आणण्यासाठी सरकारने यात लक्ष घालून समाजाचे प्रबोधन करणेही तितकेच आवश्यक आहे. अन्यथा मानवाची विनाशाकडे वाटचाल होईल हे नक्की !  

केरळमधील साम्‍यवादी सरकारचे मोगलप्रेम जाणा !

केरळच्‍या एस्.सी.ई.आर्.टी.च्‍या ११ वी आणि १२ वीच्‍या इसिहास अन् राज्‍यशास्‍त्र या पुस्‍तकांमध्‍ये एन्.सी.ई.आर्.टी.ने काढून टाकलेल्‍या मोगलांचे उदात्तीकरण करणार्‍या धड्यांचा समावेश करण्‍यात येणार.