वास्को, २६ एप्रिल (वार्ता.) – मायमोळे, वास्को येथे भटक्या कुत्र्यांनी एका महिलेवर आक्रमण केले. या वेळी कुत्र्यांनी महिलेच्या डोक्यासह शरीराला चावे घेतल्याने महिला गंभीररित्या घायाळ झाली आहे. महिलेला उपचारार्थ बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. वास्को नगरपालिकेच्या स्थानिक नगरसेविका देयवीता आरोलकर आणि मायमोळे येथील नागरिक यांच्या मते २६ एप्रिल या दिवशी घडलेली घटना ही पहिली घटना नसून यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे कुत्र्यांच्या उपद्रवावर शासनाने कठोरतेने पावले उचलणे आवश्यक आहे.
संपादकीय भूमिकाश्वानप्रेमी संघटनांना याविषयी काय म्हणायचे आहे ? त्यांच्याकडे या समस्येवर उपाययोजना नाही का ? |