हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘इस्लामी शाळा : मदरसा कि आतंकवादी केंद्र ?’
मुंबई – कोंढवा (पुणे) येथील शाळेमध्ये आतंकवादी कारवायांचे प्रशिक्षण दिले जात आहे, ही गंभीर गोष्ट इतकी वर्षे पोलीस प्रशासनाच्या लक्षात कशी आली नाही ? असे होऊ शकत नाही. प्रशासनाने या परिसरातील नागरिकांच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक होते. हिंदूंनी जागरूक राहून कुठेही अवैध किंवा अयोग्य कृती होतांना दिसल्यास त्या विरोधात त्वरित आवाज उठवायला हवा. तसेच हिंदूंनी स्वत:च्या मुलांना नियमित मंदिरात नेणे, लहानपणापासून त्यांच्यावर राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे संस्कार करणे आवश्यक आहे. जेणेकरून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे विचार हिंदू समाजमनावर रुजतील, असे मत देहली येथील लेखिका अन् इतिहास तज्ञ डॉ. रिंकू वढेरा यांनी व्यक्त केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद ‘इस्लामी शाळा : मदरसा कि आतंकवादी केंद्र ?’ या विषयावर त्या बोलत होत्या.
पुणे ‘हिंदवी स्वराज्या’चा गड होण्याऐवजी ‘आतंकवादी प्रशिक्षण केंद्र’ होणे चिंताजनक ! – नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे येथून हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला होता. पुढे थोरले बाजीराव पेशवे यांनी याच हिंदवी स्वराज्याचा विस्तार अफगािणस्तानातील अटकपर्यंत केला. असे पुणे शहर हे स्वातंत्र्योत्तर काळानंतर हिंदवी स्वराज्याचा गड होणे अपेक्षित होते; मात्र या ठिकाणी आतंकवादी कारवाया करणारे प्रशिक्षण केंद्र बनत चालले आहे, हे चिंताजनक आहे. त्यामुळे या घटनेकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून कारवाई करणे आवश्यक आहे. यापुढे हिंदूंना संघटित होऊन आक्रमणांचा सामना करावा लागेल.
आतंकवादी कारवायांच्या विरोधात हिंदू आणि सुशिक्षित नागरिक यांनी वेळीच आवाज उठवणे आवश्यक ! – दत्तात्रय उभे, संपादक, ‘अपेक्षा’ मासिक
मागील ३० वर्षांत वाढलेल्या मुसलमान लोकसंख्येमुळे पुण्यातील कोंढवा या भागाला ‘छोटा पाकिस्तान’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. या कोंढव्यातील ‘ब्लू बेल्स’ शाळेमध्ये युवकांना आतंकवादी कारवायांचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने उघड केले. इतकी वर्षे स्थानिक पोलीस प्रशासनाच्या हे लक्षात का आले नाही ? अशा शाळांना अनुमती कशी दिली जाते ? ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर बंदी आणल्यानंतरही या कारवाया चालू असतील, तर हे पुष्कळ गंभीर आहे. राजकीय वरदहस्त लाभलेले पोलीस अधिकारी माहिती असूनही अशा घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात आतंकवादी कारवायांचे प्रशिक्षण दिले जात असेल, तर हिंदू आणि सुशिक्षित नागरिक यांनी याविरोधात वेळीच आवाज उठवणे आवश्यक आहे.