पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचे सांगून काश्मीरमध्ये पंचतारांकित सुविधा उपभोगणार्‍या भामट्याला अटक

पंतप्रधान कार्यालयाचा अतिरिक्त संचालक असल्याचे सांगून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था, बुलेटप्रूफ गाडी, पंचतारांकित सुविधा मिळवणार्‍या किरण भाई पटेल या भामट्याला जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांनी अटक केली.

रत्नागिरी नगर परिषदेची पाणीपट्टी थकबाकीदारांवर कारवाई !

नगर परिषद प्रशासनाने पाणीपट्टी थकवणार्‍यांवर कठोर कारवाई चालू केली आहे. आतापर्यंत ६५ थकबाकीदारांच्या नळजोडण्या तोडण्यात आल्या आहेत.  ‘नागरिकांनी वेळीच पाणीपट्टी भरून नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करावे आणि  कारवाई टाळावी, असे आवाहन अधिकारी नंदकुमार पाटील यांनी केले आहे.

‘मासूम सवाल’ चित्रपटाच्या निर्मात्यांची सर्व तक्रारी एकत्रित करण्याची मागणी करणारी याचिका निकाली !

सॅनिटरी पॅड्सवर देवतांची चित्रे छापल्याच्या तक्रारी एकत्रित करण्यासाठी ‘मासूम सवाल’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रविष्ट केलेली याचिका सर्वाेच्च न्यायालयाने नुकतीच निकाली काढली.

प्रत्येक मदरशात सामवेद शिकवला पाहिजे ! – चित्रपट दिग्दर्शक इक्बाल दुर्रानी

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक इक्बाल दुर्रानी यांनी सामवेदाचे उर्दू भाषेत भाषांतर केले आहे. या पुस्तकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे.

आसाममध्ये ६०० मदरसे बंद केले आणि सर्वच बंद करण्याचा मानस !

जर आसामचे मुख्यमंत्री असे करू शकतात, तर अन्य राज्यांतील मुख्यमंत्री का करू शकत नाहीत ?

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेतांना अणू कार्यक्रमाविषयी तोडजोड करणार नाही ! – पाकिस्तान

पाकिस्तानी जनतेकडे एक वेळचे जेवण मिळणे अवघड झाले आहे; मात्र तेथील राज्यकर्त्यांना अणूबाँब हवा आहे. जनताही याचा विरोध करत नाही. यातून त्यांची खरी मानसिकता लक्षात येते.

मतदान अनिवार्य करण्यासाठीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास देहली उच्च न्यायालयाचा नकार !

जनतेमध्ये मतदानाविषयी असलेल्या उदासीनतेमागे कोणती कारणे आहेत, याचाही विचार करणे आवश्यक आहे. जनता मोठ्या प्रमाणात ‘नोटा’ला मत देत असल्याचेही दिसून येत आहे.

देशातील उच्च न्यायालयांतील २१६ न्यायमूर्तींची पदे रिक्त !

कॉलेजियम’ची अनुमती न मिळाल्याने देशातील उच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींची २१६ पदे रिक्त आहेत, अशी माहिती केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत दिली. कॉलेजियम ही प्रणाली न्यायमूर्तींची नियुक्ती आणि स्थानांतर यांच्याशी संबंधित आहे.

जागतिक आतंकवादी संघटनांच्या सूचीमध्ये भारतातील ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी)’ १२ व्या स्थानावर !

जागतिक आतंकवाद निर्देशांक २०२२

‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’च्या देशभरातील ११ कार्यालयांवर ‘ईडी’ची धाड

‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’च्या (सी.एन्.आय.च्या) देशभरातील ११ कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) १६ मार्च या दिवशी धाडी घालण्यात आल्या.