‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’च्या देशभरातील ११ कार्यालयांवर ‘ईडी’ची धाड

‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’च्या देशभरातील ११ कार्यालयांवर ‘ईडी’कडून धाडी

नवी देहली – ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’च्या (सी.एन्.आय.च्या) देशभरातील ११ कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) १६ मार्च या दिवशी धाडी घालण्यात आल्या.

‘सी.एन्.आय.’च्या नागपूरमधील कार्यालयाची झडती घेण्यात आली. तेथून विविध कागदपत्रे जप्त करण्यात आली.

जबलपूर डायोसिसचा वादग्रस्त बिशप पी.सी. सिंह याने ‘सीएन्आय’च्या अंतर्गत येणार्‍या शाळांमध्ये अनेक गैरप्रकार केले. संस्थेची भूमी आणि इतर आर्थिक गोष्टी यांमध्येही भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मध्यप्रदेश पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सिंह याला नागपूर विमानतळावरून अटक केली होती.