मुंबई – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने वाराणसीच्या धर्तीवर नाशिक येथील रामतीर्थावर भव्य-दिव्य स्वरूपात गोदा आरती चालू करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. याविषयी मंत्रालयात नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली असून याविषयी विस्तृत आराखडा सिद्ध करण्याची सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी आणि नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त यांना दिली आहे. या बैठकीला आमदार सौ. देवयानी फरांदे, आमदार सौ. सीमाताई हिरे, आमदार राहुल ढिकले यांसह संबंधित विभागांचे प्रशासकीय अधिकारी आणि पुरोहित संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.