शिवाजीनगर एस्.टी. स्‍थानक मूळ जागीच उभारणार ! – दादा भुसे यांची विधानसभेत माहिती

शिवाजीनगर एस्.टी. स्‍थानक मूळ जागी २ वर्षांत उभे रहाणार आहे. एकात्‍मिक विकास आराखड्याअन्‍वये हे काम करण्‍याचे नियोजन आहे, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.

कास (जिल्‍हा सातारा) परिसरातील १५५ बांधकामे अधिकृत करण्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश !

राज्‍यातील प्रसिद्ध पर्यटनस्‍थळ कास (जिल्‍हा सातारा) आणि परिसरातील येथील १५५ मिळकतधारकांनी केलेली बांधकामे अधिकृत करण्‍यात यावीत, असे आदेश मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

खरा सूत्रधार शोधून दोषींवर लवकरच कारवाई करू ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच देण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधितांवर लवकरच कारवाई होईल; मात्र खरा सूत्रधार कोण हेही शोधले जाईल.

‘मी केवळ सभागृहापुरती उपसभापती आहे का ?’ अशी डॉ. नीलम गोर्‍हे यांनी व्‍यक्‍त केली खंत !

विधीमंडळात होणार्‍या कार्यक्रमाविषयी मला कल्‍पना दिली जात नाही. कार्यक्रमाविषयी अधिकार्‍यांकडून माहिती मिळते. मी केवळ सभागृहापुरती उपसभापती आहे का ? अशी खंत उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी विधान परिषदेत उपस्‍थित केली.

महाराष्‍ट्रात साकव बांधण्‍यासाठी केंद्र सरकारकडे १ सहस्र ६०० कोटी रुपये निधीची मागणी ! – रवींद्र चव्‍हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

हा निधी उपलब्‍ध झाल्‍यानंतर कोकणासह राज्‍यात छोटे-छोटे पूल लवकरात लवकर बांधण्‍यात येतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्‍हाण यांनी १६ मार्च या दिवशी विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्‍या घंट्यांत दिले.

(म्‍हणे) ‘बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्र शास्‍त्री महाराज यांच्‍या वसई येथील कार्यक्रमाला अनुमती देऊ नका !’

बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्र शास्‍त्री महाराज यांचा वसई-विरार येथे १८ आणि १९ मार्च या दिवशी एक कार्यक्रम होत आहे. त्‍यांनी आपले साधू, संत आणि जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांचा अवमान करणारे विधान करून लाखो वारकर्‍यांच्‍या भावना दुखावल्‍या आहेत.

नाशिक महापालिका ‘एस्.टी.पी. प्लांट’चे ‘अमृत योजने’च्या माध्यमातून होणार आधुनिकीकरण !

विधानसभेत आमदार हिरामण खोसकर यांनी त्र्यंबकेश्वर गोदावरी नदी स्वच्छतेविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. या वेळी झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी सहभाग घेतला.

मूर्तीवरील नित्योपचार तात्काळ चालू करा ! – देवीभक्त सकल हिंदु समाजाची मागणी

हिंदु धर्मशास्त्रानुसार मूर्तीमधील चैतन्य जागृत रहाण्यासाठी कोणत्याही देवतेवर स्नान-अभिषेक आदी नित्योपचार परंपरा चालू असणे अत्यावश्यक असते. ही परंपराच बंद असल्याने समस्त देवीभक्तांच्या श्रद्धांचे हनन होत आहे.

मेहबूबा मुफ्ती यांच्याकडून शिवलिंगावर जलाभिषेक !

निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी अशांना धर्मनिरपेक्षतेचे डोस न पाजल्याचाच हा परिणाम आहे ! आता तरी त्यांना हा डोस पाजण्यात येईल का ? कि केवळ हिंदूंनीच धर्मनिरपेक्षतेचे पालन करत आत्मघात करून घेत रहायचा ?