हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ओटीटी’ची वेब सिरीज कि अश्लीलतेचे माध्यम ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
(टीप : ‘ओटीटी’ म्हणजे ‘ओव्हर द टॉप’ ! चित्रपट आदी पहाण्याचे ऑनलाईन माध्यम)
मुंबई – आज वेब सिरीज एक प्रभावी माध्यम झाले आहे. वेब सिरीज किंवा ओटीटीला कुठलीही सेन्सॉरशिप लागू केलेली नाही. सरकारने वेब सिरीजवर नियंत्रण ठेवले पाहिजे. वेब सिरीजसह वाहिन्यांवर दाखवण्यात येणार्या मालिका, कार्यक्रम यांच्यासाठीही सेन्सॉर बोर्ड लागू करायला हवा, अशी मागणी ‘केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळा’चे माजी सदस्य श्री. सतीश कल्याणकर यांनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ओटीटीची वेब सिरीज कि अश्लीलतेचे माध्यम ?’, या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.
सेन्सॉर बोर्डवरील व्यक्तींना प्रशिक्षण न दिले जाणे हे धक्कादायक ! – सतीश कल्याणकरसेन्सॉर बोर्डवर पूर्वीपासूनच योग्य आणि जाणकार व्यक्ती नेमलेल्या नाहीत. देश, समाज, संस्कृती यांविषयी आपले काय उत्तरदायित्व आहे ? याविषयी काय कायदे आहेत ? हे सेन्सॉर बोर्डवर असणार्या लोकांना ठाऊक आहे का ? मी याविषयी यापूर्वीच केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. सेन्सॉर बोर्डवर नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना प्रशिक्षण देण्याचे प्रावधान असतांनाही त्यांना कुठलेही प्रशिक्षण दिले जात नाही, हे धक्कादायक आहे. सेन्सॉर बोर्डच्या प्रशिक्षणात उत्तीर्ण झालेल्यांना तिथे काम करण्याची अनुमती द्यावी. |
वेब सिरीजचा लहान मुलांवर होत आहे विदारक परिणाम ! – गायत्री एन्., संस्थापिका, भारत व्हॉईस
चित्रपटांसाठी सेन्सॉर बोर्ड आहे; मात्र वेब सिरीज आणि ओटीटी यांच्यासाठी हे लागू झालेले दिसत नाही. वेब सिरीजमधील संवादामध्ये वापरण्यात येणारी शिवराळ भाषा, आणि दाखवण्यात येणारी हिंसा यांमुळे देश-विदेशातील लहान मुलेही त्याचे अनुकरण करत आहेत. हे थांबायला हवे.
पहा आणि इतरांनाही पहायला द्या –
OTT की वेबसीरीज या अश्लीलता का माध्यम ? | Are #OTTs a platform for #webseries or a medium to spread obscenity? https://t.co/pS6sAUgU2Z
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) March 11, 2023
वेब सिरीजच्या विरोधात सरकार ठोस पावले उचलेपर्यंत लढा चालूच ठेवू ! – अधिवक्त्या अमिता सचदेवा, प्रवक्त्या, हिंदु जनजागृती समिती
आज वेब सिरीजमधून हिंसेला प्रोत्साहन दिले जात आहे. वेब सिरीजमध्ये हिंदु धर्म, देशाचे सैन्य आदींविषयी चुकीचे चित्रण दाखवले जाते, हे रोखण्यासाठी सेन्सॉर बोर्ड नाही. या संदर्भात हिंदु जनजागृती समिती गेल्या काही वर्षांपासून न्यायालयीन लढा देत आहे. वेब सिरीजच्या विरोधात सरकार जोपर्यंत ठोस पावले उचलत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील.