मशिदींसाठी ‘वक्फ बोर्ड’ आहे, तर मंदिरांसाठी ‘हिंदु बोर्ड’ का नाही ? – अधिवक्ता विष्णु जैन, सर्वाेच्च न्यायालय

मंदिरांचे संरक्षण आणि व्यवस्थापन यांसाठी सरकार मंदिरांचे अधिग्रहण न करता ‘हिंदु बोर्ड’ स्थापन करून त्यांच्याकडे मंदिरे का सोपवत नाही ? या बोर्डमध्ये हिंदु धर्माशी संबंधित अधिकारी व्यक्तींना स्थान देऊन त्यांना ‘पब्लिक सर्व्हंट’चा दर्जा द्यावा.

जळगाव येथे महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी केळीची रोपे आणि रांगोळ्या यांची सजावट !

शुभकार्यात केळीची रोपे लावण्याची सनातन धर्मपरंपरा आहे. ती या परिषदेनिमित्त आलेल्या राज्यभरातील मंदिर विश्वस्त, पुरोहित आणि अधिवक्ते यांना अनुभवायला मिळाली. सात्त्विक रांगोळ्यांनी परिषदेचा परिसर सुशोभित करण्यात आला होता.

संभाजीनगर येथील घोटाळ्‍यातील धर्मांधाला ४ वर्षांनंतर बेंगळुरू येथून अटक !

एकूण ७५ लोकांना २ कोटी रुपयांचा गंडा घालणार्‍या ‘रिदास इंडिया’ आस्‍थापनाच्‍या संचालकाला ४ वर्षांनंतर पोलिसांच्‍या आर्थिक गुन्‍हे शाखेने बेंगळुरू येथून अटक केली आहे.

व्‍यासपिठावर साहित्‍यिक पुढे आणि राजकारणी मागे हवेत ! – कवी कुमार विश्‍वास यांचे परखड मत

मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी भाषणात अनेक ‘इंग्रजी’ शब्‍द वापरले. ‘सर्टिफिकेट’, ‘इंजिनिअरिंग’, ‘आयकॉनिक’, ‘लायब्ररी’, असे म्‍हणत मराठीचे महत्त्व त्‍यांनी सांगितले.

ग्रंथालय चळवळीला सरकारकडून आर्थिक साहाय्‍याची अपेक्षा ! – डॉ. गजानन कोटेवार, अध्‍यक्ष, राज्‍य ग्रंथालय संघ

साहित्‍य संमेलनामध्‍ये ग्रंथपालाला प्रतिष्‍ठा मिळाली नाही, अद्यापपर्यंत एकाही ग्रंथपालाला राज्‍य पुरस्‍कार मिळालेला नाही; कारण शासनकर्त्‍यांनी ग्रंथांविषयीची संवेदनशीलता गमावली आहे.

‘पाणथळ वाचवा’ मोहिमेचा कुडचडे येथील नंदा तळे येथे शुभारंभ

गोव्याच्या नंदा तळ्यासह देशातील ७५ पाणथळ ठिकाणांना ‘रामसर साईट्स’ म्हणून घोषित करण्याची दृष्टी ठेवल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार आणि अभिनंदन.

केंद्रशासनाच्या अहवालानुसार ३११ प्रदूषित नद्यांच्या सूचीमध्ये गोव्यातील ६ नद्या

श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे जलप्रदूषण होत असल्याची आवई उठवणारे तथाकथित पर्यावरणवादी उद्योग आणि कारखाने यांच्याकडून टाकाऊ पदार्थ नद्यांमध्ये सोडले जात असतांना गप्प का ?

आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीच्या दर्शनाला भाविकांचा महासागर

श्री भराडीदेवीचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवीची ओटी भरली. या वेळी त्यांनी ‘महाराष्ट्रातील जनता, शेतकरी यांना सुखी ठेव’, असे साकडे श्री भराडीमातेच्या चरणी घातले.

विशाळगडावरील अतिक्रमण काढण्‍यासाठी १ कोटी १७ लाख रुपयांच्‍या खर्चास मान्‍यता !

अतिक्रमण काढण्‍याचा सर्व व्‍यय प्रारंभी शासन करणार आहे. नंतर हा व्‍यय संबंधित अतिक्रमणधारकांकडून वसूल केला जाणार आहे.

संभाजीनगर येथे शाळेचे शुल्‍क ४० टक्‍के वाढवल्‍याने पालकांचे ठिय्‍या आंदोलन !

शाळेच्‍या व्‍यवस्‍थापनानेच जाणूनबुजून शुल्‍क वाढवले आणि पालकांनी विरोध केल्‍यावर ती चूक मुद्रणालयावर ढकलली. पालकांनी संघटितपणे लढा दिल्‍यामुळे शाळेचे व्‍यवस्‍थापन वठणीवर आले. यापुढे पालकांनी असाच वैध मार्गाने लढा चालू ठेवावा.