जळगाव – येथे आयोजित महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेनिमित्त प्रवेशद्वारावर जिल्ह्याचे प्रसिद्ध पीक म्हणून प्रचलित असलेल्या केळीची रोपे लावण्यात आली होती. शुभकार्यात केळीची रोपे लावण्याची सनातन धर्मपरंपरा आहे.
ती या परिषदेनिमित्त आलेल्या राज्यभरातील मंदिर विश्वस्त, पुरोहित आणि अधिवक्ते यांना अनुभवायला मिळाली. सात्त्विक रांगोळ्यांनी परिषदेचा परिसर सुशोभित करण्यात आला होता.