‘डॉ. आंबेडकर जिवंत असते, तर मी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या असत्या’ म्हणणार्‍या दलित नेत्याला अटक

तेलंगाणामध्ये ‘राष्ट्रीय दलित सेना’ नावाची संघटना चालवणारे नेते हमारा प्रसाद यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते.

आफ्रिका खंडातील १३ देशांमध्ये सैनिकी तळ बनवण्याचा चीनचा प्रयत्न !

आफ्रिका खंडातील देशांना कर्ज देऊन त्यांना आर्थिक गुलाम बनवण्याच्या सिद्धतेत असणार्‍या चीनने आता तेथे सैनिकी तळ स्थापन करण्याची सिद्धता केली आहे. यासाठी चीनने १३ देशांची निवड केली आहे.

(म्हणे) ‘इस्लाम भारताबाहेरून आलेला नाही !’ – महमूद मदनी, जमीयत-उलेमा-ए-हिंद

यावर कुणी कधीतरी विश्वास ठेवील का ? अशा प्रकारची विधाने करून देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. यातून ‘भारत हा इस्लामवाद्यांचा देश आहे’, असे सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

रा.स्व. संघाला तमिळनाडूमध्ये पथसंचलन करण्यास मद्रास उच्च न्यायालयाकडून अनुमती

मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पथसंचलन करण्याची अनुमती दिली आहे. तमिळनाडू पोलिसांना या संदर्भात न्यायालयाने आदेश दिला आहे.

सूर्याचा एक मोठा भाग निखळून पडली भेग !

या घटनेविषयी जगभरातले वैज्ञानिक चिंतेत आहेत. काही अभ्‍यासकांचे यावर म्‍हणणे आहे की, ही घटना अनपेक्षित नाही. सौरचक्राच्‍या ११ वर्षांच्‍या कालावधीत अशी घटना सौरचक्रात एका वेळी एकाच ठिकाणी घडते.

हिंदूंच्‍या आंदोलनामुळे प्रशासनाने श्री कानिफनाथ मंदिराच्‍या परिसरातील जमावबंदी २४ घंट्यांत हटवली !

‘वक्‍फ बोर्डा’चा ‘लँड जिहाद हिंदूंचे नोंदणीकृत मंदिर बळकावू पहाणारे ‘वक्‍फ बोर्ड’ हे सरकार, पोलीस, प्रशासन आणि कायदा यांना जुमानत नसल्‍याचे सिद्ध होते. असे बोर्ड हवे कशाला ? ते त्‍वरित विसर्जित केले पाहिजे !

‘वंदे भारत’ रेल्‍वेमुळे आर्थिक केंद्रे धार्मिक केंद्रांना जोडली जातील ! – पंतप्रधान

यापूर्वी खासदार त्‍यांच्‍या भागांतील स्‍थानकांवर रेल्‍वेगाडी थांबण्‍याची मागणी करत. आता ते ‘वन्‍दे भारत’ रेल्‍वे चालू करण्‍याची मागणी करत आहेत. हे भारताच्‍या आधुनिकतेचे लक्षण आहे.

‘गायीला आलिंगन देण्‍याचा दिवस’ साजरा करण्‍याचे आवाहन केंद्रशासनाकडून मागे !

भारतात हिंदुद्वेषी लोकांची संख्‍या अल्‍प नाही, त्‍यामुळे अशा प्रकारचा विरोध होणे नवीन नाही. त्‍यावर केंद्र सरकारने ठाम राहून हे आवाहन कायम ठेवायला हवे होते.

पणजी येथे ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे पुन्हा अपघात !

पणजी येथे ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे अपघातांची मालिका चालूच ! स्मार्ट सिटीच्या कामामुळे ट्रक खड्ड्यात पडल्याची घटना ताजी असतांनाच १० फेब्रुवारी या दिवशी मालवाहू टँकर रस्त्याच्या शेजारी खोदलेल्या चरात कलंडला. या वेळी सुदैवाने टँकरचा चालक आणि साहाय्यक वाचले.

पणजी हे गोव्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर

देशातील ३८९ प्रदूषित शहरांच्या सूचीमध्ये पणजी शहराचा २३० वा क्रमांक लागतो. ‘पी.एम्.१०’चे प्रमाण ३१९ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर असलेले हरियाणामधील सोनेपत शहर हे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर आहे.