‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’मधून पहाण्यात आली घटना !
नवी देहली – सूर्याला एक भेग पडली असून सूर्याचा एक मोठा भाग त्याच्यापासून वेगळा झाला आहे. हा वेगळा झालेला भाग आता सूर्याभोवतीच फिरत आहे, असे अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’मधून पहाण्यात आली आहे. तमिथा स्कोव नावाच्या हवामान विषयक संशोधकांनी ही माहिती ट्वीट करून दिली आहे. त्यामध्ये त्यांनी ‘नासा’चा व्हिडिओही ट्वीट केला आहे.
या घटनेविषयी जगभरातले वैज्ञानिक चिंतेत आहेत. काही अभ्यासकांचे यावर म्हणणे आहे की, ही घटना अनपेक्षित नाही. सौरचक्राच्या ११ वर्षांच्या कालावधीत अशी घटना घडू शकते. अशा प्रकारची घटना सौरचक्रात एका वेळी एकाच ठिकाणी घडते.