(म्हणे) ‘इस्लाम भारताबाहेरून आलेला नाही !’ – महमूद मदनी, जमीयत-उलेमा-ए-हिंद

जमीयत-उलेमा-ए-हिंदचे प्रमुख महमूद मदनी यांचा दावा !

महमूद मदनी

नवी देहली – इस्लामचे सर्व धर्मांशी जुने नाते आहे. इस्लाम भारताबाहेरून आलेला नाही. भारत आमचा देश आहे. भारत जितका नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांचा आहे, तितकाच तो महमूद मदनी यांचाही आहे. मदनी यांच्यापेक्षा इंच अधिक किंवा अल्प नाही, असे विधान जमीयत-उलेमा-ए-हिंदचे प्रमुख महमूद मदनी यांनी केले. ते येथील रामलीला मैदानात चालू असलेल्या जमीयत-उलेमा-ए-हिंदच्या अधिवेशनात बोलत होते. ‘संघ आणि मुसलमान यांच्यात कोणताही वाद नाही’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

मदनी पुढे म्हणाले की,

१. भारत अल्लाचे पहिले पैगंबर अब्दुल बशर सईदाला आलम यांची भूमी आहे. भारत मुसलमानांची पहिली मातृभूमी आहे. यामुळे ‘इस्लाम बाहेरून आला’, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आणि आधारहीन आहे. भारत हिंदी मुसलमानांसाठी सर्वांत चांगला देश आहे.

२. अल्पसंख्यांकांच्या विरोधात हिंसा करणार्‍यांना शिक्षा देणार्‍यांसाठी स्वतंत्र कायदा बनवण्याची आवश्यकता आहे. मुसलमानांविषयी द्वेष आणि चिथावणी यांची प्रकरणे आणि इस्लामद्वेष यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

३. आज देशात द्वेषाचे वातावरण आहे. आधारहीन प्रचार करण्याचे काम जोरात चालू आहे. जे देशासाठी धोकादायक आहेत, त्यांना मोकळे सोडले जात आहे.

४. आताच्या स्थितीमध्ये जर स्वामी विवेकानंद, मोहनदास गांधी, नेहरू आणि चिश्ती यांचे आदर्श मानणारे नेते तमाशा पहात असतील, तर देशाची स्थिती काय होईल, याची कल्पना करता येणार नाही.

_________________________________

भेदभाव आणि शत्रूत्व विसरून एकत्र येऊन देशाला जगात शक्तीशाली करूया !

रा.स्व. संघ आणि त्याचे सरसंघचालक यांना आमंत्रण देतो की, या आणि आपण आपल्यातील भेदभाव अन् शत्रूत्व विसरून एकमेकांना आलिंगन देऊया. देशाला जगातील शक्तीशाली देश बनवूया. आम्हाला सनातन धर्माच्या तेजाविषयी कोणतीही तक्रार नाही. तुम्हालाही इस्लामविषयी कोणतीही तक्रार असू नये, असे आवाहनही मदनी यांनी या वेळी केले. ते म्हणाले की, आमच्या विरोधातील घटनांत काही वर्षांत वाढ झाली आहे. सरकारने अशा घटनांच्या विरोधात ज्या प्रकारे कारवाई केली पाहिजे होती, ते त्यांचे दायित्व होते, त्याचे पालन केले जात नाही. देशात हिंदुत्वाची व्याख्याच पालटण्यात आली आहे. (मदनी जिहादी आतंकवादाविषयी का बोलत नाहीत ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

यावर कुणी कधीतरी विश्वास ठेवील का ? अशा प्रकारची विधाने करून देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. यातून ‘भारत हा इस्लामवाद्यांचा देश आहे’, असे सांगण्याचा हा प्रयत्न आहे; मात्र भारताच्या उन्नतीत अशा किती इस्लामवाद्यांचा सहभाग आहे आणि भारतामधील अराजकतेमागे अन् अन्य चुकीच्या गोष्टींमध्ये त्यांचा किती सहभाग आहे, याचीही चर्चा होण्याची आवश्यकता आहे !