रा.स्व. संघाला तमिळनाडूमध्ये पथसंचलन करण्यास मद्रास उच्च न्यायालयाकडून अनुमती

चेन्नई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पथसंचलन करण्याची अनुमती दिली आहे. तमिळनाडू पोलिसांना या संदर्भात न्यायालयाने आदेश दिला आहे. न्यायमूर्ती आर्. महादेवन् आणि न्यायमूर्ती महंमद शफीक यांच्या खंडपिठाने हा आदेश दिला आहे.

यापूर्वी एकल न्यायमूर्तींकडून पंथसंचलनाला अनुमती नाकारण्यात आली होती. त्याला संघाने खंडपिठासमोर आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने आदेश देतांना नागरिकांचे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचा हवाला दिला.