हिंदूंच्‍या आंदोलनामुळे प्रशासनाने श्री कानिफनाथ मंदिराच्‍या परिसरातील जमावबंदी २४ घंट्यांत हटवली !

वक्‍फ बोर्डाकडून ‘ॐ चैतन्‍य कानिफनाथ देवस्‍थान’ची भूमी बळकावण्‍याचा प्रयत्न !

राहुरी (जिल्‍हा नगर), १० फेब्रुवारी (वार्ता.) – धर्मादाय कार्यालयात नोंदणीकृत असलेले येथील ‘ॐ चैतन्‍य कानिफनाथ देवस्‍थान’च्‍या भूमीवर वक्‍फ बोर्डने ‘कान्‍होबा देवस्‍थान तथा रमजान बाबा दर्गा’ या नावाने दावा केला आहे. त्‍यामुळे मंदिरात हिंदूंना पूजा आणि आरती करण्‍यास विरोध केला जात होता. मंदिर परिसरात हिंदूंना प्रवेश रोखण्‍यासाठी प्रशासनाने ९ फेब्रुवारीला अचानकपणे कलम १४४ (जमावबंदी) लागू केले. हे कलम हटवण्‍याच्‍या मागणीसाठी गुहा या गावातील हिंदूंनी संघटित होऊन मोठ्या संख्‍येने ठिय्‍या आंदोलन केले. या आंदोलनानंतर प्रशासनाला अवघ्‍या २४ घंट्यांत, म्‍हणजे १० फेब्रुवारीला हे कलम हटवणे भाग पडले. यासह प्रशासनाने हिंदूंच्‍या काही मागण्‍या मान्‍य करत मंदिरात पूजन, आरती आणि अभिषेक करण्‍याची अनुमती दिली. यानंतर आंदोलकांनी मंदिरात प्रवेश करून श्री कानिफनाथ महाराजांची महाआरती केली.

या वेळी हिंदुत्‍वनिष्‍ठांकडून मागण्‍यांचे निवेदन श्रीरामपूर येथील उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांना देण्‍यात आले. या आंदोलनात महिलाही उत्‍स्‍फूर्तपणे मोठ्या संख्‍येने सहभागी झाल्‍या होत्‍या.

श्री कानिफनाथ महाराजांना अर्पण केलेला महाप्रसाद धर्मांधांनी लाथाडला !

प्रतिकात्मक चित्र
  • धर्मांधांचा पराकोटीचा हिंदुद्वेष जाणा ! हिंदूंनो, अशांच्‍या विरोधात केवळ तक्रार करून थांबू नका, तर त्‍यांना कठोरात कठोर शिक्षा करण्‍यास पोलीस-प्रशासनाला भाग पाडा !
  • अशांविरुद्ध पुरोगामी अवाक्षरही काढत नाहीत, हे लक्षात घ्‍या !
  • २१ जानेवारी २०२३ या दिवशी श्री कानिफनाथ महाराजांना अर्पण केलेला महाप्रसाद धर्मांधांनी लाथाडला. तरीही हिंदूंनी शांततेची भूमिका घेतली. प्रसादाची लाथाडणार्‍या धर्मांधांवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदूंनी केली. अशी मागणी हिंदूंना का करावी लागते ? प्रशासन स्‍वतःहून कारवाई का करत नाही ? असे अन्‍य पंथियांच्‍या संदर्भात घडले असते, तर पोलीस आणि प्रशासन यांनी अशीच बघ्‍याची भूमिका घेतली असती का ?यावर श्रीरामपूर येथील उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी संबंधितांवर कारवाई करण्‍याचे अश्‍वासन दिले.

रमजान बाबा दर्ग्‍याची नोंदणी रहित करा ! – हिंदूंची एकमुखी मागणी

या वेळी हिंदूंनी दिलेल्‍या निवेदनात ‘रमजान बाबा दर्ग्‍याची चौकशी करून त्‍याची नोंदणी रहित करावी’, अशी एकमुखी मागणी हिंदूंनी प्रशासनाकडे केली. यासह ‘श्री कानिफनाथ महाराज मंदिराच्‍या परिसरात ‘मंदिर ट्रस्‍ट’चा फलक लावण्‍यास अनुमती द्यावी’, तसेच ‘

श्री कानिफनाथ मंदिराच्‍या इनामी मिळकतींवरील सर्व अनधिकृत बांधकामे त्‍वरित हटवावीत’, अशाही मागण्‍या करण्‍यात आल्‍या.

संपादकीय भूमिका

हा ‘वक्‍फ बोर्डा’चा ‘लँड जिहाद’च नव्‍हे का ? हिंदूंचे नोंदणीकृत मंदिर बळकावू पहाणारे ‘वक्‍फ बोर्ड’ हे सरकार, पोलीस, प्रशासन आणि कायदा यांना जुमानत नसल्‍याचे सिद्ध होते. असे बोर्ड हवे कशाला ?सरकारने ते त्‍वरित विसर्जित केले पाहिजे !