जिल्हा प्रशासन विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी कटीबद्ध : शिवभक्तांनी करसेवा करू नये ! – राहुल रेखावार, जिल्हाधिकारी

विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासन बांधील आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी काही प्रशासकीय गोष्टी पूर्ण कराव्या लागतात, त्या आम्ही पूर्ण करू. गडावर ज्यांच्याकडे रहिवासी असल्याचा कोणताही अधिकृत पुरावा नाही, हे अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत हटवलेच जाईल.

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भ्रष्टाचार !

पुसांडे याने विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्काची रक्कम शासनाच्या खात्यात न भरता स्वत:च्या वैयक्तिक खात्यात भरली, तसेच काही विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त रक्कमही वसूल केली.

आदिल खान याने पहिल्या हिंदु पत्नीवर इस्लाम स्वीकारण्यासाठी बळजोरी केली ! – राखी सावंत, अभिनेत्री

राखी सावंत यांनी आदिल खान दुर्रानी मारहाण करत असल्याची तक्रार केल्यानंतर ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आदिल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

शॅकधारकांकडून समुद्रकिनार्‍यांवर अवैधरित्या कुपनलिका आणि शौचालयांचे ‘सोक पिट’

कांदोळी आणि कळंगुट किनारपट्टी भागांत मोठ्या प्रमाणावर पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले आहे. कुपनलिका खोदल्याने आणि शौचालयाचे शोष खड्डेही खोदल्याचे आढळून आले आहे.

अजित डोवाल आणि पुतिन यांची भेट

अफगाणिस्तानच्या नैसर्गिक संसाधनांचा वापर त्यांच्या नागरिकांच्या कल्याणासाठीच झाला पाहिजे. लष्कर-ए-तोएबा, जैश-ए-महंमद सारख्या आतंकवादी संघटनांना नष्ट करण्यासाठी सदस्य देशांत गुप्तहेर आणि सुरक्षा सहकार्य असणे आवश्यक आहे.

सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’ संघटनेची राज्यपालांकडे मागणी

म्हादई अभयारण्य व्याघ्र राखीव क्षेत्र घोषित करण्याची आवश्यकता नाही. म्हादईप्रश्नी गोव्याची न्यायालयीन बाजू भक्कम आहे आणि म्हादईप्रश्नी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही.- देविया राणे

भारत, चीन आणि इराण यांच्या अफगाणिस्तानमधील दूतावासांवर आक्रमण करणार  

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून समोर आली इस्लामिक स्टेट(खुरासान)ची धमकी !

म्हादई नदीचे पाणी वळवल्याने गोव्यावर होणार्‍या दुष्परिणामांचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार मंडळ नेमले जाणार !

गोवा सरकारने याचिकेत म्हादई वन्यजीव अभयारण्य, म्हादई आणि भीमगड अभयारण्य येथील पर्यावरणाशी संबंधित महत्त्वाची सूत्रे मांडली आहेत.

पाटलीपुत्र (बिहार) येथे सोनसाखळी चोरांकडून गोळीबार

बिहारमधील जंगलराज ! भुरटे चोरही आता गोळीबार करू लागले आहेत, हे बिहार पोलिसांना लज्जास्पद !