पाटलीपुत्र (बिहार) येथे सोनसाखळी चोरांकडून गोळीबार

४ जण घायाळ

पाटलीपुत्र (बिहार) – येथील ऊर्जा स्टेडियमच्या प्रवेशद्वार क्रमांक २ येथे एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरतांना चोरट्यांनी ४ जणांवर गोळीबार केल्याची घटना घडली. सोनसाखळी चोरून नेत असतांना येथील वसतीगृहाच्या संचालिका आणि कर्मचारी यांनी त्यांना अडवले. या वेळी चोरट्यांनी गोळीबार केला.

संपादकीय भूमिका

बिहारमधील जंगलराज ! भुरटे चोरही आता गोळीबार करू लागले आहेत, हे बिहार पोलिसांना लज्जास्पद !