Bareilly Durga Mandir : बरेली (उत्तरप्रदेश) : दुर्गा मंदिरावर ‘अल्लाह’ आणि ‘७८६’ लिहिल्यामुळे हिंदूंमध्ये संताप !

पोलिसांकडून अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंद

प्राचीन दुर्गा मंदिरावर ‘७८६’ आणि ‘अल्लाह’ लिहिल्याची घटना

बरेली (उत्तरप्रदेश) – अज्ञातांनी शहरातील प्राचीन दुर्गा मंदिरावर ‘७८६’ आणि ‘अल्लाह’ लिहिल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक हिंदूंनी यावरून संताप व्यक्त केला असून पोलिसांना याविषयी माहिती दिल्यानंतर त्यांनी अज्ञातांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला. हे मंदिर बिहारीपूर भागात आला हजरत दर्ग्यासमोर आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करून हिंदु जनतेचा रोष शांत केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, हे कृत्य करणार्‍यांना ओळखण्यासाठी ते संपूर्ण परिसर, तसेच मंदिराच्या आजूबाजूचे ‘सीसीटीव्ही’मधील चित्रीकरण पडताळत आहेत. आक्षेपार्ह शब्द लिहिणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन पोलिसांनी दिले आहे.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

संपादकीय भूमिका

  • जर एखाद्या मशिदीवर अथवा दर्ग्यावर कुणी ‘ॐ’ अथवा ‘श्री’ यांसारखे पवित्र चिन्ह लिहिले असते, तर संताप व्यक्त करण्याच्या ठिकाणी ‘सर तन से जुदा’च्या (शिरच्छेदाच्या) घोषणा दिल्या गेल्या असत्या आणि केवळ बरेली अथवा उत्तरप्रदेश राज्यच नाही, तर संपूर्ण देश पेटला असता, हेच खरे !
  • हिंदूंमधील अतीसहिष्णु वृत्तीचाच हा परिणाम आहे, हे विसरता कामा नये !