आदिल खान याने पहिल्या हिंदु पत्नीवर इस्लाम स्वीकारण्यासाठी बळजोरी केली ! – राखी सावंत, अभिनेत्री

राखी सावंत

मुंबई – आदिल खान याच्या पहिल्या पत्नीने मला दूरभाष करून सांगितले, ‘मी एक हिंदु मुलगी आहे. लग्न करण्यासाठी आदिल याने मला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी बळजोरी केली’, असे वक्तव्य अभिनेत्री राखी सावंत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. आदिल खान यांच्या अधिवक्त्यांनी मात्र राखी सावंत यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

राखी सावंत यांनी आदिल खान दुर्रानी यांच्याशी विवाह करून इस्लाम धर्म स्वीकारला आहे. विवाहानंतर काही मास दोघांनी विवाहाची माहिती लपवून ठेवली होती. मध्यंतरी राखी सावंत यांनी आदिल खान दुर्रानी याच्यासमवेत विवाह केल्याचे प्रसिद्धीमाध्यमांसमोर उघड केले. राखी सावंत यांनी आदिल खान दुर्रानी मारहाण करत असल्याची तक्रार केल्यानंतर ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आदिल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.