New Year Liquor Sales : नववर्षानिमित्त मद्य पिण्यात उत्तरप्रदेश आघाडीवर : ६०० कोटी रुपयांचे मद्य विकले गेले !

तेलंगाणा दुसर्‍या, तर राष्ट्रीय राजधानी क्षेत्र तिसर्‍या क्रमांकावर !

नवी देहली – ख्रिस्ताब्द नववर्षाच्या निमित्ताने भारतियांनी मद्य पिण्याचा नवा विक्रम केला आहे. देशात नववर्षानिमित्त ६०० कोटी रुपयांचे मद्य एकट्या उत्तरप्रदेशात विकले गेले. यानंतर तेलंगाणातील लोक ४०२ कोटी रुपयांचे मद्य प्यायले. तिसर्‍या क्रमांकावर राष्ट्रीय राजधानी क्षेत्र असून तेथे ४०० कोटी रुपयांचे मद्य विकले गेले. कर्नाटकात ३०८ कोटी रुपये, तर केरळ राज्यात हा आकडा १०८ कोटी रुपये इतका होता. उत्तराखंडमध्ये एका दिवसात मद्यविक्रीसाठी एकूण ६०० परवाने देण्यात आले.