न्यू ऑर्लिन्स (अमेरिका) येथील ट्रकच्या आक्रमणात १५ लोक मारले गेल्याचे प्रकरण
न्यू ऑर्लिन्स (अमेरिका) – ख्रिस्ताब्द नववर्षाचे स्वागत करण्याच्या निमित्ताने जमलेल्या लोकांना एका भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना अमेरिकेच्या न्यू ऑर्लिन्स येथून समोर आली होती. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी ट्रकचालकावर गोळीबार करून त्याला ठार मारले. आक्रमणकर्त्याची ओळख ४२ वर्षीय शम्सुद्दीन जब्बार अशी असून तो अमेरिकी नागरिक आहे. तो टेक्सास राज्याचा रहिवासी आहे.
42-year-old former military officer Shamsuddin Jabbar identified as attacker in New Orleans (USA) truck attack that claimed 15 lives
This incident once again highlights that while the victims of terrorism may belong to any religion, terrorists themselves often have a religious… pic.twitter.com/O2pGtnwyWE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 2, 2025
१. जब्बार हा जॉर्जिया स्टेट विद्यापिठाचा पदवीधर असून तो साधारण १० वर्षे अमेरिकी सैन्यामध्ये अधिकारी पदावर कार्यरत होता. सध्या तो एका बहुराष्ट्रीय आस्थापनात नोकरी करत होता. तेथे त्याला १ लाख २० सहस्र डॉलर म्हणजे जवळपास एक कोटी रुपये वार्षिक पगार होता.
२. जब्बारच्या ट्रकवर इस्लामिक स्टेटचा ध्वज होता. ट्रकमध्ये ए.आर्. स्टाईल रायफल, पिस्तूल आणि काही बाँब सापडले आहेत. जब्बारने चिलखत परिधान केले होते आणि त्याच्याकडे रायफल होती.
३. अमेरिकी गुप्तचर संस्था एफ्.बी.आय.चे अधिकारी एलेथिया डंकन यांनी या घटनेसंदर्भात माहिती देतांना म्हटले की, जब्बार याने हे हत्याकांड एकट्याने घडवले नाही. त्याच्यासमवेत अनेक लोक सहभागी आहेत. त्यांच्या शोधासाठी आम्हाला जनतेच्या सहकार्याची आवश्यकता आहे.
संपादकीय भूमिकाआतंकवादाला बळी पडलेल्यांचा धर्म कोणताही असला, तरी आतंकवाद्यांना धर्म असतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट करणारी ही घटना ! |