मुलगा मनोरुग्ण असल्याने उपचार चालू
जबलपूर (मध्यप्रदेश) – जिल्ह्यातील पाटणमधील ‘जय बजरंग आखाडा’ येथे (व्यायामशाळेच्या जागेत) मुसलमान मुलाने श्री हनुमानाची मूर्ती तोडून भूमीत गाडल्याचे समोर आले आहे. या कृत्याची माहिती मिळताच स्थानिक हिंदू संतप्त झाले. ‘याचा परिणाम काहीही होऊ शकतो’, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे. त्यानंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपी अल्पवयीन मुसलमान मुलाला कह्यात घेतले. (मुसलमान मौला-मौलवींनी मदरशांमधून मुसलमान मुलांना हिंदुद्वेष शिकवल्याचा हा परिणाम नसेल कशावरून ! सामाजिक सलोखा बिघडवणार्या अशा घटना रोखण्यासाठी मदरशांवर लक्ष ठेवणे आवश्यक ठरले आहे ! – संपादक) मुसलमान मुलगा मनोरुग्ण असल्याने त्याच्या औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
Mu$l|m boy breaks and buries Shri Hanuman vigraha in Jabalpur (Madhya Pradesh); The boy is undergoing treatment for mental health issues.
Will secularists explain how is ir that those who vandalize Hindu temples or idols are mentally ill, and why they target only Hindu idols and… pic.twitter.com/JW7sMvbzbT
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 3, 2025
१. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूर्यकांत शर्मा म्हणाले की, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून पोलिसांनी आरोपींच्या विरोधात कारवाई चालू केली आहे. परिसरात शांतता राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
२. या घटनेनंतर बजरंग दलाचे जिल्हा निमंत्रक राजा ठाकूर यांनी हा धार्मिक भावनांवर आघात असल्याचे सांगत अशा घटना खपवून घेतल्या जाणार नसल्याचे सांगितले. ‘हे थेट आपल्या श्रद्धेवर आक्रमण असून भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जाईल’, अशी चेतावणी हिंदु संघटनांनी दिली आहे.
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
संपादकीय भूमिका
|