भारत, चीन आणि इराण यांच्या अफगाणिस्तानमधील दूतावासांवर आक्रमण करणार  

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून समोर आली इस्लामिक स्टेट(खुरासान)ची धमकी !

नवी देहली – इस्लामिक स्टेट (खुरासान) या आतंकवादी संघटनेने अफगाणिस्तानमधील भारत, इराण आणि चीन यांच्या दूतावासांवर आक्रमण करण्याची धमकी दिली आहे. याद्वारे तालिबान आणि संयुक्त राष्ट्रांतील देश यांच्यातील संबंध बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हटले जात आहे. या संदर्भात संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

इस्लामिक स्टेट (खुरासान) स्वतःला तालिबानला पर्याय असल्याचे समजत आहे. ‘तालिबान अफगाणिस्ताचे संरक्षण करण्यास सक्षम नाही’, असे या अहवालात म्हटले आहे. या आतंकवादी संघटनेचे मध्य आणि दक्षिण आशियामध्ये ३ सहस्र आतंकवादी आहेत. ते सध्या अमली पदार्थांचा व्यवसाय करत आहेत.